आर्य चाणक्य एका गुराख्याच्या मुलाला चंद्रगुप्ताला सम्राट बनवतात. पुढे त्या मुलातसुद्धा अहिंसेचे भूत जागे होते आणि तो मुलाच्या हातात कारभार देऊन स्वतः जैन धर्म स्वीकारून सन्यास घेऊन जायला निघतो. आचार्य त्याला एकच वाक्य बोलतात “ तुला सुद्धा शेवटी या भूमीचा गुण लागलाच “
हे अत्यंत कटू सत्य आहे. ज्या वेळी आपल्याला आपला कणखरपणा दाखवण्याची वेळ येते त्यावेळी आपला अर्जुन का होतो ? हा मला नेहमी पडणारा प्रश्न आहे. जितकी व्यक्ती मोठी , जितकी विचारवंत , जितकी ज्ञानी तितका अर्जुन विषाद अधिक धारधार.
ज्ञानी लोकांचे हे नैतिक अधःपतन माझे मन विषण्ण करते.
अठराव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत दोन महायुद्धे झाली. जगातील सगळी प्रमुख राष्ट्रे या युद्धात सहभागी होती सगळ्यांनी आपले साम्राज्य राखण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी रक्ताचे पाट वाहू दिले.
आपल्या देशातील तरुणाई युध्द भूमीवर रक्ताची होळी खेळायला पाठवली. परंतु याचा एक सकारात्मक परिणाम असा झाला कि त्या देशातील लोकांना त्याग म्हणजे काय, राष्ट्रनिष्ठा हा नक्की काय विषय आहे आणि आपल्या देशाची सीमा हि तलवारीच्या धारीवर अवलंबून असते या तिन्ही गोष्टींची पूर्ण जाणीव झाली. याचा परिणाम या देशात पंचमस्तम्भीय प्रवृत्ती कधी विकसित झाली नाही. अशी प्रवृत्ती असणारे लोक हे त्या देशातील संपूर्ण समाजाच्या हेटाळलीचे विषय ठरले.
ज्यावेळी इतर देशातील तरुणाई रक्ताची होळी खेळत होती, त्यावेळी आपण शांतीपाठ गात बसलो होतो. अहिंसेचे भूत आपल्या मानगुटीवर स्वार झाले होते. त्याचा परिणाम म्हणजे मोक्याच्या वेळी आपल्याकडील विद्वानांचा अर्जुन होणे हाच आहे.
गेली सत्तर वर्षे आपण चरख्याने स्वातंत्र्य मिळवून दिले असे म्हणतो आहोत. वास्तवात ब्रिटीशांशी समोरासमोर लढाई होऊन जितके सैनिक बळी पडले नसते तितके सामान्य नागरिक आणि स्त्रिया बळी जाऊन स्वातंत्र्य मिळाले . स्त्रिया तर बलात्कारांनी विटंबना होऊन मग बळी गेल्या. सुमारे दहा लाख सामान्य नागरिकाच्या मृतदेहांवर आणि लक्षावधी स्त्रियांच्या प्राणांतिक किंकाळ्यान्च्या पायावर आपले स्वातंत्र्य उभे आहे.
त्यांच्या मृत्यूमध्ये काहीही शौर्य नव्हते. होती ती हतबलता, तडफड आणि हकनाक मरण पावत असल्याची जाणीव. एखाद्या सशाला किंवा हरिणाला त्याच्या शरीराचे लांडगे लचके तोडताना जसे वाटेल नक्की तीच भावना त्या अभागी जीवांची होती.
युद्धात लढणारा सैनिक तळहातावर प्राण घेऊनच उतरलेला असतो. मरेतो मारेन हीच भावना त्याच्या हृदयात असते. रणभूमीवर येणारा मृत्यू त्याच्यासाठी स्वर्गाचे दार उघडणार या बद्दल त्याच्या मनात संशय नसतो कारण तो राष्ट्रासाठी वीरगतीला प्राप्त होणार असतो. तो मृत्यू उदात्त असतो, वंदनीय असतो.
जे निरपराध फाळणीच्या दंगलीत बळी गेले ते हकनाक गेले. नाही चिरा नाही पणती असा मृत्यू त्यांच्या भाळी चरख्यावर कातलेल्या सुताच्या धाग्याने लिहिला गेला.
आपण इतके विकृतघ्न आहोत कि आपण त्या नृसंश कालखंडाचा उल्लेख सुद्धा टाळतो. आपल्याला फक्त गोडश्याने मारलेला महात्माच दिसतो. त्या अश्राप जीवांचे तळतळाट, तडफड त्यांचे हाल आपल्याला काहीच दिसत नाही. हे त्यांचेच तळतळाट आहेत कि आज स्वातंत्र्य मिळवून ७० वर्षे झाली तरी आपल्याकडील सामान्य नागरिकांचे आणि शूर सैनिकांचे रक्त वाहणे थांबत नाही.
आपण युद्धाचे स्मारक बनवले. आपण जालियानवाला बाग हत्याकांडाचे स्मारक बनवले. पण आपण फाळणीमध्ये हकनाक बळी गेलेल्यांचे आणि संपूर्ण देशभरातील हिंदूंचे स्मारक आजवर बनवलेले नाही. त्यांची माफी आपण मागितली नाही. मला गेले काही दिवस हे प्रकर्षाने वाटते आणि जाणवते आहे आपण अजूनही त्यांच्या ऋणात आहोत. आपण त्यांचे स्मारक बनवले पाहिजे.
केवळ बोट चेपेपणा आणि ज्यावेळी कर्तव्य करायचे त्यावेळी जागा झालेला अर्जुन विषाद याचा परिणाम म्हणजे फाळणीच्या वेळेसचा कत्तलखाना आहे.
हि सगळी पार्श्वभूमी सांगण्याचे कारण आपल्याकडील तथाकथित विचारवंत आणि बुद्धीजीवी ( बुद्धीभेदी ) परत एकदा त्याच उद्योगाला लागली आहे. म्हणून त्यांना आरसा दाखवणे आवश्यक आहे.
आता वर्तमानात.
युद्धाचे जसे ढग जमा होऊ लागले आहेत तसा आपल्या विचारवंत मंडळींचा फुकाचा आणि मिडिया आणि फुरोगामी मंडळींचा पैसे खाऊन अर्जुन विषाद जागा झाला आहे.
आता परत युद्ध नको बुद्ध हवा सारख्या घोषणा देत फलक घेऊन हि मंडळी बाहेर पडतील.
आणि आता आपल्या प्रत्येक सामान्य भारतीयाला श्रीकृष्ण व्हायचे आहे.
या पद्धतीचे बोलणारी मंडळी सोशल साईट असो किंवा वैयक्तिक चर्चा असो, परिसंवाद असो किंवा टीव्हीवरील चर्चा. जिथे कुठे हि मंडळी दिसतील त्यांना मुद्देसूद बोलून निरुत्तर करायचे.
त्यांना ठामपणे सांगायचे आता नवीन भारत आहे आणि हा श्रीकृष्णाला मानणारा भारत आहे.
धर्मरक्षण, राष्ट्राच्या सीमेचे रक्षण हा आमचा धर्म आहे आणि तो आम्ही निष्काम कर्म या भावनेने पार पाडणार आहोत.
या मार्गात आडवा येणारा प्रत्येक जण नष्ट होईल. रक्ताचे पाट वाहतील पण आम्ही आता थांबणार नाहीत.
तुमची बाष्कळ बडबड बंद करा. आम्ही सामान्य जन आहोत आमच्यातूनच या देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक जात असतात. त्यामुळे युद्ध भूमीवर धारातीर्थी पडेल तो आमचा भाऊ, आमचा मुलगा, आमचा नवरा असेल.
तुमच्या पैकी कोणीही सीमेवर लढायला जात नाही. तुमचे कोणी आप्तेष्ट सैन्यात नाहीत. त्यामुळे तुमच्या फुकटच्या शांतीपाठांची आम्हाला आवश्यकता नाही.
ज्या बुद्धाचे तुम्ही गुणगान करत आहात त्याच बुद्ध धम्माने असाच राष्ट्रद्रोह करून खैबरखिंडीतील वाटा दाखवल्या आणि या देशावर मुस्लीम अंमल येऊ शकला. यावेळी ती चूक होणार नाही.
ज्या बुद्धाचे तुम्ही गुणगान करता त्याच बुद्ध भिक्कूनी म्यानमार मध्ये शस्त्र हाती घेऊन रोहिंग्या मुसलमानांची कत्तल केली आणि त्यांना बाहेर हाकलून दिले.
त्यामुळे आम्ही तुमचे ऐकायचे असेल तर आधी त्या म्यानमार मधील बुद्ध भिक्कुंना त्यांची शस्त्रे म्यान करायला सांगा मग आम्ही तुमचे ऐकू.
हा देश आता हिंदू राष्ट्र होणारच आहे.
इथे मुस्लीम, ख्रिश्चन सुद्धा तितक्याच सुखाने आणि आनंदाने नांदतील. त्यांचा धर्म मुस्लीम असेल , ख्रिश्चन असेल. पण ते सांस्कृतिक दृष्ट्या हिंदू असतील.
ते नमाज पढतील, कुराण च्या वचनांचे पालन करतील. पण त्यांना श्रीराम आणि श्रीकृष्ण सुद्धा वंदनीयच असतील.
ते चर्च मध्ये जातील बायबल च्या वचनांच्या अनुसार जीवन व्यतीत करतील पण विद्येची देवता म्हणून त्यांना सरस्वती आणि गणेश नेहमीच वंदनीय असेल.
आम्हाला या पद्धतीचा एकजिनसी भारत घडवायचा आहे.
आम्हाला १०० कोटी नागरिक एकजिनसी हवे आहेत.
तुमच्या सारखे सडके कुजके नासके लोक या प्रक्रियेतील अडथळा आहात. तुम्ही दुहेरी बुद्धिभेद करतात. आजवर करू शकला या पुढे नाही.
आता या मुख्य प्रवाहात सामील व्हा अन्यथा कचरा कुंडीत फेकून देऊ.
युद्ध नको बुद्ध हवा हि घोषणा देणे तुमचा हक्क नक्कीच आहे.
पण हि किती फोल घोषणा आहे हे सिद्ध करण्याचा आमचा हक्क सुद्धा आम्ही वापरणार आहोतच.
|| यतो धर्मः स्ततो जयः ||
हे कायम लक्षात ठेवा.. आपण धर्माच्या बाजूने आहोत. बुद्धीभेदी अधर्मी आहेत त्यांच्या मायाजालात फसू नका.
अधर्मी मंडळीना ठेचायाची अप्रतिम संधी आली आहे आता आपल्या सरकार आणि सैन्याचे हात आपण मजबूत केलेच पाहिजेत.
प्रविण दत्ताजी गायकवाड
No comments:
Post a Comment