*अनुपम खेरचा इंटरव्ह्यू ऐकला होता.*
*त्यात त्यांनी एक प्रसंग सांगितला, मनाला खूप भावला..*
*'आखरी रास्ता' ची शूटिंग चालू होती. अनुपम खेर तयार होत होते. सेट वर एसी नव्हता..प्रचंड गर्मी होत होती. मी इतका मोठा कलाकार आणि आणि माझ्यासाठी एसी नाही, ह्या भावनेने त्यांचा इगो दुखावला गेला.*
*त्यांनी व्यवस्थापन कमिटीला धाऱ्यावर धरलं.*
*खूप काही ऐकवलं.*
*थोड्या वेळाने त्यांचं लक्ष एका कोपऱ्यात गेलं..तिथे अमिताभ बच्चन एका खुर्चीवर पुस्तक वाचत बसले होते. त्यांचं ते दाढीचा गेटअप, अंगावर शॉल आणि त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही त्रास दिसत नव्हता.*
*ते उठले आणि अमितजी कडे गेले..*
*ते बोलले..*
*"सर..बहुत गर्मी है.."*
*"हं" असं म्हणून त्यांनी पुन्हा पुस्तकात डोकं घातलं..*
*"आपको नही हो रही गर्मी सर?"*
*अमितजी ने डोकं वर केलं आणि बोलले..*
*"गर्मी के बारे में सोचता हूँ, तो होती है..वरना नही होती.."*
*ह्या एका वाक्यात जीवनाचा सार सांगितला आहे त्यांनी..*
*आज सगळीकडे भयावह परिस्थिती आहे..पुढे काय होईल ह्याची चिंता आहे..*
*पण रात्र नंतर सकाळ अटळ आहे..ह्याच्या आधीही खूप संकट आले आहेत* *मानवजातीवर पण त्यावर आपण मात केलं आहे..*
*आज बऱ्याच लोकांमध्ये नैराश्य येत आहे..मानसिक संतुलन जात आहे..*
*हे काही अंत नाही..ह्यातून बाहेर पडणारच आहोत आपण..*
*आपण ह्या परिस्थितीकडे कोणत्या स्वरूपात पाहतो, त्यावर आपल्याला त्रास होणार का आपण आनंदी राहणार हे ठरलेलं आहे.*
*ह्या काळात मी न घाबरता जगलो, आनंदी होतो,लोकांसाठी जितकं शक्य तितकं केलं..ह्या आठवणी बनवायचे आहेत का मी सतत घाबरत, रडत, सहानुभूती घेत दिवस काढले अशा आठवणी करायचे आहेत हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे.*
*So cheer up..हसा,आई वडिलांशी बोला,त्यांचं ऐकून घ्या,बायकोला लव्ह यू म्हणा..मुलांसोबत खेळा..आपल्या परिचिताना कॉल करा..ज्यांना मदत करता येते, करा..*
सर्वात मोठी गोष्ट आनंदी रहा, नियमाचे पालन करा आणि मस्त जीवन जगा
*'रुक जाना नही, तू कही हार के..'*
OM SRI SAIRAM....
No comments:
Post a Comment