_एका वकीलाने आपली विहीर एका शिक्षकाला विकली._
_लेनदेन, कागदी कारवाई सर्व व्यवस्थित झाल्यानंतर दुसर्या दिवशी वकील शिक्षकाकडे गेला._
*वकील :* मास्तर, मी तुम्हाला फक्त विहीर विकली आहे त्यातील पाणी नाही. तेव्हा तुम्हाला पाणी हवं असेल तर त्याचे वेगळे पैसे मोजावे लागतील.
*शिक्षक :* बरं झालं, आपण आलात आणि विषय काढला. नाहीतर मीच तुमच्याकडे येणार होतो. तर मग आल्यासरशी तुम्ही तुमचं पाणी घेऊन जा नाहीतर माझ्या विहीरचे भाडे तुम्हाला द्यावे लागेल.
*वकील :* तसं काही नाही मास्तर मी थोडीशी तुमची गंमत करत होतो.
*शिक्षक :* लेका, तुझे जज्ज, मामलेदार, तहसीलदार माझ्याकडून शिकून गेलेत. आणि तु मामुल वकील माझ्यापुढे शहाणपणा दाखवतोयत.
_*....तमाम शिक्षकांना समर्पित*_
No comments:
Post a Comment