रोज मागत होता ना देवाकडे
कंटाळा आलाय जगण्याचा, ह्या धावपळीचा
मग, ऐकली आहे ना त्याने प्रार्थना
थांबवलं आहे त्याने सगळं जग
तुम्हाला आराम मिळावा म्हणून
तुमची धावपळ कमी व्हावी म्हणून
म्हणत होता ना पिल्लाशी खेळायला वेळ मिळत नाही
त्याचे बोबडे बोल ऐकू येत नाहीत
आता खेळा ना मनसोक्त, ऎका त्याचे बोबडे बोल
तृप्त होई पर्यंत
नको वाटत होता ना रोजचा लटकून केलेला प्रवास
आता लोळा की मस्त घरात, कधी बेडवर कधी सोफ्यावर
म्हणत होता ना गार टिफिन खावा लागतो रोज
आता केली ना त्याने सोय रोज घरच गरमागरम जेवण मिळण्याची
दिली आहे त्याने सुट्टी साऱ्या जगाला तुम्हाला आराम मिळावा म्हणून
कारण तुम्हीच रडत होता रोज का देवा जन्माला घातल म्हणून
ऐकतो तो प्रार्थना प्रत्यय आता आलाच असेल
तर चला करू परत सगळे प्रार्थना हे सगळं सुरळीत होण्याची,
ऐकेल जरूर तो हाक त्याच्या पिल्लांची
नक्की काळजी आहे त्याला आपल्या सगळ्यांची
एवढंच म्हणे देव आहे....👍💐
No comments:
Post a Comment