Sunday, May 17, 2020

ट्रेनने प्रवास

एकदा मी मुंबईहून दिल्लीला ट्रेनने प्रवास करत होतो!

🚆
 जेव्हा ट्रेन सुरू झाली तेव्हा मी एसी -1 कूपमध्ये एकटाच प्रवास करत होतो.

 थोड्या वेळाने, एक सुंदर स्त्री आली आणि समोरच्या सीटवर बसली!

 मला फार आनंद झाला

 ती बाई माझ्याकडे पाहुन हसत राहिली ...😘
 यामुळे मला आणखी आनंद झाला😊

 मग ती येऊन माझ्या शेजारी बसली ...
 
 त्यानंतर ती माझ्याकडे झुकली आणि माझ्या कानात कुजबुजली ...

 "तुमची सर्व रोकड, कार्डे व मोबाईल फोन माझ्याकडे द्या, अन्यथा मी मोठ्याने ओरडून सांगेन की तुम्ही माझा छळ करीत आहात आणि गैरवर्तन करीत आहात " 

 मी तिच्याकडे पाहिलं 🙄

 मी माझ्या बॅगमधून एक पेपर आणि एक पेन काढला आणि लिहिले- "माफ करा, मला ऐकू येत नाही किंवा बोलता येत नाही ... कृपया तुम्हाला जे म्हणायचे आहे या कागदावर लिहा"

 त्या लेडीने पूर्वी जे काही सांगितले ते सर्व तिने लिहून दिले आणि ते मला दिले!

 मी तिची नोंद घेतली, ती माझ्या खिशात छान ठेवली ...

 मी उठलो आणि तिला स्पष्ट स्वरात सांगितले ... *"आता ओरड आणि तुला किती बोंबलायच आहे तेवढ बोंबल !!"*

 कथेचा नैतिक अर्थ:  *दस्तऐवजीकरण खूप महत्वाचे आहे*   
(नाहीतर युती तुटली नसती...😜🤭)

story

एक ताबा सुटलेली भरधाव कार लग्नावरून परतणाऱ्या डॉ. उमेश आणि अश्विनी सावरकर आणि त्यांची केवळ ३ महिन्यांची बछडी मीरा, यांच्या कारला अमरावती जवळ जोरदार धडक देते... 

आई कमरेतले हाड तुटून आणि चिमुरडी मुलगी मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन बेशुध्द होतात, 

रस्त्यावरची काही माणसे गंभीर जखमी डॉ. उमेश आणि अश्विनी यांना एका हॉस्पिटलमध्ये आणि प्रसंगावधान ठेऊन लहानग्या मीराला एका पेडीएट्रीक हॉस्पिटलमध्ये दाखल करतात.

मीराला दाखल केल्या केल्याच व्हेंटिलेटर लावला जातो, दुसऱ्या दिवशी जरा सावरलेले डॉ. उमेश मिराच्या हॉस्पिटलमध्ये पोचतात, 

जवळपास ब्रेन-डेड झालेली मीरा काही केल्या वाचणं शक्य नाही हे डॉ उमेश यांच्या लक्षात येतं, कमरेचं हाड मोडल्याने गंभीर जखमी असलेल्या पण आता शुद्धीवर असलेल्या डॉ अश्विनी यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये परत येऊन जवळ घेतात, पतीचे डोळे पाहून डॉ अश्विनी यांचे डोळे सुद्धा पाण्याचे डबडबतात...पतीच्या कानात येऊन त्या कुजबुजतात,”ऑर्गन डोनेशन.” बांध फुटलेले दोघे एकमेकांना सावरण्याचा निष्फळ प्रयत्न करत राहतात.

ते स्वतः डॉक्टर असल्याने आणि या प्रकारची पूर्ण माहिती असल्याने डॉ. उमेश आता ऑर्गन डोनेशनच्या तयारीला लागतात, स्वतःचे आभाळाएव्हढे दु:ख बाजूला ठेऊन स्वतःच्या पोटच्या पोरीचे ऑर्गन कुणाला उपयोगी ठरू शकतील याची देशभरातली यादी तपासायला लागतात, ज्यांच्यात मीराचे अस्तित्व जिवंत राहील अशी दोन नावे मिळतात, 

एव्हाना मीराला व्हेंटिलेटरवर ठेवून चार दिवस झालेले असतात, वेगाने पावले उचलली जातात, मीराचे अवयव काढून एअर ऍम्ब्युलन्सने शिफ्ट करायची तयारी केली जाते,

 हे सगळ करायला फक्त चार तास उरतात, डॉक्टर दांपत्य पोटाच्या पोरीला छातीशी कवटाळून बसतात, इतर डॉक्टर ऑर्गन डोनेशनची तयारी सुरु करतात...ग्रीन कॉरिडॉर सुद्धा तयार केला जातो आणि तितक्यात....

...तितक्यात मीराला जोरदार हार्ट अटॅक येतो....आई-वडलांच्या समोर मीरा अखेरचा श्वास घेते.....

.....दु:खाने काळीज पिळवटून टाकणारा हंबरडा आई-वडील फोडतात...पोटच्या पोरीचे अस्तित्व सुद्धा आता जपता येणार नाही या विचाराने आधार देण्यापलीकडे जाऊन कोलमडून जातात....

हळूहळू दिवस, आठवडे, महिने जातात...कामे सुरु होतात...आई-वडील उभे राहायच्या प्रयत्नात असतात....

अचानक एके दिवशी ब्रेकफास्ट टेबलावर, मीरा असली असती तर मीराचा वाढदिवस दोन महिन्यांवर आलेला दोघांना जाणवतो....आत्तापावेतो सांभाळलेले दोघेही जण पुन्हा एकदा फुटतात....एकमेकांना सावरत असताना धीरोदात्तपणे काही निर्णय घेतात....दोघांचेही डोळे अंतस्थ आनंदाने लकाकतात....

दोन महिन्यांवर आलेल्या मिरच्या वाढदिवशी कुणा लहानग्याला , ज्याला सरकारी मदत मिळू शकत नाही अश्याला वैद्यकीय मदत देऊन जीवन देण्याचे ठरवतात...

शोधाशोध सुरु करतात...मुंबईतल्या देवनार आणि अंबेजोगाई इथली दोन मुले सापडतात...

दोघांचेही ओपन हार्ट ऑपरेशन होणार आहे आणि दोघेही फार गरीब असून त्यांना सरकारी कुठलीही मदत मिळण्याची शक्यता नाहीये...

दोघांनाही संपर्क केला जातो....ऑपरेशनचा दिवस ठरतो...विख्यात हार्ट सर्जन तयार होतात....ऑपरेशनचा दिवस उजाडतो...त्याचं दिवशी दोन्ही मुलांमधल्या एकाला आयत्या वेळी सरकारी मदत जाहीर होते...त्याचे नाव यादीतून गळते....

आता उरते मुंबईतल्या देवनार इथली रोजगारीवर काम करणाऱ्या आणि कुठल्याही सरकारी मदतीच्या निकषांवर न बसणाऱ्या श्री. पराटे यांची तिसरी मुलगी पायल...

गेल्या तब्बल वर्षभरापासून पैश्यांअभावी ऑपरेशन टाळत असणाऱ्या पायलचे ऑपरेशन सुरु होते...ऑपरेशन संपते...पूर्ण खर्च डॉ. उमेश आणि अश्विनी उचलतात ...ऑपरेशन झाल्या झाल्या आणि पायल शुद्द्धीवर आल्या आल्या पायललाही उचलून कडेवर घेतात....आत्मसमाधानाने......मीराला कडेवर घेतल्याच्या आत्मिक आनंदाने...

...आणि एक निर्णय घेतात...दरवर्षी मीराच्या वाढदिवशी एका ‘मीरा’ला जगवण्याचा....

डॉ. उमेश आणि डॉ. अश्विनी...दोघांचे आभार आणि तुम्हां दोघांच्या सामाजिक आनंदात आम्ही सर्व सव्वाशे कोटी भारतीय नागरिक सुद्धा सहभागी आहोत....

मिलिंद वेर्लेकर,
टीम भारतीयन्स

सुंदर दृष्टांत*🙏

.   🙏 *सुंदर दृष्टांत*🙏

एक संन्यासी फिरत फिरत एका दुकानावरून जात होता. त्याचे सहज लक्ष गेले त्या दुकानात बरेच लहान मोठे डबे, बरण्या होत्या. त्या संन्याशाच्या मनात सहज एक विचार आला आणि त्याने त्या दुकानदाराला एक डबा दाखवून विचारले की यात काय आहे? दुकानदार म्हणाला त्यात मीठ आहे. संन्यासी बुवांनी आणखी एक डब्याकडे बोट दाखवून विचारले यात काय आहे? दुकानदार म्हणाला यात साखर आहे. असे करत करत बुवांनी शेवटच्या डब्याकडे बोट करून विचारले आणि यात काय आहे? दुकानदार म्हणाला यात श्रीकृष्ण आहे. सन्यासी अचंबित झाला आणि म्हणाला अरे या नावाची कोणती वस्तू आहे मी तर कधी ऐकली नाही हे तर देवाचे नाव आहे. दुकानदार संयसीबुवांच्या अज्ञानाला हसून म्हणाला "महाराज तो रिकामा डबा आहे पण आम्ही व्यापारी रिकाम्या डब्याला रिकामा नाही म्हणत त्यात श्रीकृष्ण आहे असे म्हणतो."
बुवांचे डोळे खाडकन उघडले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले. ते ईश्वराला म्हणाले "अरे कोणत्या कोणत्या रूपाने तू ज्ञान देतोस. ज्यागोष्टी साठी मी एवढा भटकलो घरदार सोडून सन्यासी झालो ती गोष्ट एक दुकानदाराच्या तोंडून मला ऐकवलीस. परमेश्वरा मी तुझा शतशः आभारी आहे". असे म्हणून त्याने त्या दुकानदाराला साष्टांग नमस्कार केला.
*जे मन-बुद्धी- हृदय काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, ईर्षा, द्वेष, चांगले-वाईट आणि सुख-दुःख* अशा लौकिक गोष्टीने भरले आहे तिथे श्रीकृष्ण म्हणजेच भगवंत कसा राहील? जे रिकामे आहे म्हणजेच एकदम स्वच्छ आहे अशाच ठिकाणी म्हणजे अशाच मन, बुद्धी व हृदयात परमेश्वर वास करतो. लोकाना दाखवायला गीता व ज्ञानेश्वरी वाचली किंवा एकादशीला आळंदी-पंढरपूरची वारी केली *तरी मन-बुद्धी-हृदय जोपर्यंत रिकामे होत नाही म्हणजे स्वच्छ होत नाही तोपर्यंत परमेश्वर तिथे वास करणार नाही*

सापुतारा सहल , बॅग भरणे व नवरा-बायकोतील संवाद

*अशा रीतीने आमची सापुतारा सहलीची खरेदी पार पडली !* 😜😜
-------------------------------

*सापुतारा सहल , बॅग भरणे व नवरा-बायकोतील संवाद !* 😀😀
( काही सत्य तर काही काल्पनिक संवाद )
--------------------------------
*नवरा :-* सापुतार्याला जाण्यासाठीची माझी बॅग भरून झाली , तू केंव्हा भरणार ? 
*बायको :-* त्यात काय डोंबलं भरणार ?
*नवरा :-* म्हणजे ?
*बायको :-* तुम्ही बॅग मध्ये काय काय भरलं ?
*नवरा :-* चिखलदर्याच्या वेळेस नेलेल्या 2 पॅन्ट आणि 2 T-shirts !
*बायको :-* पुन्हा तेच ? तोच लाल आणि पिवळा T-Shirt का ?
*नवरा :-* हो , तेच !
*बायको :-* कमाल आहे तुमची ..........., 
तसं जमत नसतं , नवीन घ्यावे लागतील !
*नवरा :-* अग पण ते कपडे चांगलेच आहेत , कुठेच फाटले नाहीत !
*बायको :-* समजा ते फाटलेच नाहीत , तर काय आयुष्यभर याच कपड्यावर ट्रिप करणार का ? 
*नवरा :-* काय बोलणार ? 
मी .... निरुत्तर  !!
म्हणजे याचा अर्थ तू सुद्धा नवीन ड्रेस घेणार आहेस का ? 
*बायको :-* हं मग , हे काय विचारणं झालं ?
*नवरा :-* पण मला वाटतं याची काहीच गरज नाही !
*बायको :-* गरज नाही हे मला ही पटतं , पण मार्केटचा  काही विचार करणार का नाही ? 
*नवरा :-* म्हणजे ?
( मी तर उडालोच )
*बायको :-* तुमच्याकडे पैसे नाहीत का ? 
*नवरा :-* पैसे आहेत , पण नव्या कपड्यांची गरज नाही  !
*बायको :-* या तुमच्या अशा विचारसरणी मुळेच आपल्या देशात मंदी आली आहे , रेसेशन आलं आहे ?
आज लोकांच्या घरात / व्यापाऱ्याच्या घरात दिवाळी साजरी होऊ शकत नाही , याला तुमच्या सारखी *भंगार* विचारसरणी कारणीभूत आहे !
*नवरा :-* 
अग बाई मी काय गेलं ? 
देशात मंदी येण्याचं खापर तू माझ्या डोक्यावर का फोडतेस ? 
*बायको :-* 
अहो पैसे असूनही ते खर्च न करणे हा गुन्हा नाही का ? 
मला एकच्या ऐवजी दोन ड्रेस घेतले , पाडव्याची ओवाळणी म्हणून दोन साड्या घेतल्या तर .......
1) कारखानदार 
2) साडी विक्रेता 
3) सेल्समन 
4) फॉल पिको वाला 
5) ब्लाउज शिवणारा टेलर 
6) ड्रायक्लिन वाला 
7) इस्त्रीवाला .........या सर्वांना 4 पैसे मिळतील का नाही ?
8) म्हणून आपण हॉटेलिंग 
9) पर्यटन 
10) नाटक , चित्रपट 
11) आदी प्रकारची हौसमौज केली पाहिजे 
........माझ्या समाधानासाठी नाही , *मार्केट मधली मंदी घालवण्यासाठी !*
*नवरा :-* मी काही बोलणार , एवढ्यात तीच पुन्हा म्हणाली .....
*बायको :-*
हे पहा मला नवे कपडे घालून मिरवायची अजिबात हौस नाही ....
आणि माझ्या पार्लर मध्ये  जाण्यावरही सारखी टीका करता त्याचं ही उत्तर आज ऐकून घ्या ......
फेशियल करून , मसाज करून , स्टीम घेऊन कुणी सुंदर दिसत नसतं , हे काय मला कळत नाही का ? 
मी स्वतः सुंदर दिसावे म्हणून *ब्युटीपार्लर* मध्ये जात नाही ...माझ्याकडचे चार पैसे मिळवल्या मुळे पार्लरवाली बाई खुश होते , तिचा चेहरा उजळतो , आणि ती अधिक सुंदर दिसते .....
*म्हणून मी पार्लर मध्ये जाते !*😜😜

*मला काहीच न बोलू देता बायकोच पुढे म्हणाली :-*
आता कळालं का मी एवढी सुंदर का दिसते ते !
अहो ज्या बाईचे एवढे सुंदर विचार आहेत , ती बाई कुरूप दिसेलच कशी ?
*नवरा :-* 
मी आश्चर्य चकित होऊन तिच्याकडे पहात होतो एवढ्यात ती म्हणाली .....
*बायको :-*
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती , पैसे उधळती परोपकारे ......!
*नवरा :-*
अग ते तसं नाही .....
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती 
देह कष्टविती परोपकारे .....
*बायको :-*
मला वाटलंच तुम्ही अजून माझी चूक कशी काढली नाही ते ? 
तुम्हा नवरे मंडळीला न , फक्त बायकांच्या चुका काढण्यातच धन्यता वाटते !
अहो .....
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती , 
पैसे उधळती परोपकार 
याचा मतितार्थ ...लक्षात घ्या ....
कष्ट केल्या शिवाय पैसे मिळतील का ? 
*नवरा :-*
बायकोचे विचार ऐकून मी सुन्न झालो , देशात आलेल्या मंदीला " मीच कारणीभूत आहे " याचा मला साक्षात्कार झाला .... आणि आम्ही खरेदीला बाहेर पडलो !
*बायको :-*
सगळ्या मार्केट मध्ये बायको अर्थतज्ज्ञ असल्या सारखी चालत होती आणि मी खरेदीच्या बॅगा बोकांडीवर घेऊन ....निमूटपणे तिच्या मागे मागे चालत होतो ! 😄
*शेवटी ती मला एवढंच म्हणाली ........*
*कविराज ......*
*" कविता लिहीणं वेगळं आणि कविता जगणं वेगळं "*

*अशा रीतीने आमची सापुतारा सहलीची खरेदी पार पडली , आणि माझ्या मनात विचार आला " आपल्या बायकोला अर्थ क्षेत्रातलं नोबेल प्राईज द्यायला काय हरकत आहे !*
😄😄😄🙏🙏🙏🙏

*प्रा.विजय पोहनेरकर*
*9420929389*
*औरंगाबाद , 30/10/2019.*

फेव्हिक्विक

फेव्हिक्विकची एक जुनी जाहिरात पाहत होतो. एका तळ्याकाठी मासे पकडायला आलेला एक अवखळ, चंचल खेडवळ माणूस आणि एक उच्चशिक्षित,शिष्ट माणूस यांच्यातला प्रसंग दाखवणारी ती जाहिरात.
एका साध्या काठीला फेव्हिक्विकचे चार थेंब लावून दोन मिनिटांत मासे पकडणारा तो खेडवळ माणूस पाहिला की, त्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक वाटल्यावाचून राहत नाही.

स्मार्ट वर्क करण्याचं कसब ही तशी सोपी गोष्ट नाही. पण, बहुतेकांना तेच जमत नसतं. लिहिता येणं आणि शैलीदार लेखन करणं यांत जसा फरक आहे, तसाच फरक काम करण्याच्या पद्धतीतही दिसून येतो.
साक्षरतेच्या दृष्टीकोनातून अशिक्षित माणसं व्यवहारज्ञानाच्या बाबतीत मात्र पुष्कळ चतुर निघतात, हे सत्य तर कुणीच नाकारू शकणार नाही.

लिहिता-वाचता न येणाऱ्या माणसांनीच रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग असे दुर्गम आणि अजिंक्य किल्ले उभारले, पुष्करणी बांधल्या, बारा-बारा मोटांच्या विहिरी बांधल्या. तीन-तीनशे वर्षे ऊन, वारा, पाऊस, समुद्राच्या लाटा यांना अखंड तोंड देत उभी असणारी बांधकामं करणारी माणसं साक्षर नव्हती, पण चतुर मात्र नक्कीच होती.
आता मात्र परिस्थिती उलटी फिरली आहे. पुस्तकी साक्षरता आली खरी, पण व्यवहारातलं चातुर्य मात्र गमावलं.

देवगिरी किल्ल्यावर अमुक एका ठिकाणी टाळी वाजवली की तमुक ठिकाणी तो आवाज कसा पोहोचतो, याचं कोडं आजही भल्याभल्यांना उलगडलेलं नाही. अजिंठ्याची चित्रं आणि त्यांचे रंग, कोणार्क-हंपी ची शिल्पकला, काडेपेटी एवढ्या डबीत मावणारी अख्खी नऊवारी अस्सल रेशमी साडी, तांब्या-पितळेच्या नक्षीदार वस्तू पाहिल्या की, भारतीय बुद्धिमत्तेचं मनोज्ञ दर्शन घडतं.

कोल्हापूरचा देवीचा किरणोत्सव आजही तोंडात बोटं घालायला लावतो. ते मंदिर घडवणारे शिल्पकार कोणत्या महाविद्यालयातून शिकलेले होते? सालारजंग वस्तुसंग्रहालयासारखी ठिकाणं पालकांनी आवर्जून पहावीत आणि डोळसपणे आपल्या मुलांना दाखवावीत अशी आहेत. कारण, ती केवळ कला-कुसर नाही, तर भारतीय बुद्धिमत्तेचा तो आविष्कार आहे. केरळीयन पंचकर्म आणि अभ्यंग ज्यांनी विकसित केलं, त्यांच्या बुद्धिमत्तेचा आवाका आपण लक्षात घेतला पाहिजे. पंचांग ही आपल्या खगोलशास्त्रीय बुद्धिमत्तेची पावतीच आहे. आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर सर्वसंगपरित्याग करायला शिकवणारी आपली संस्कृती आज सबंध जगाच्या दृष्टीनं अभ्यासाचा विषय आहे. हीच तर आपल्या बुद्धिमत्तेची कमाल आहे.
कोणत्याही विद्यापीठाच्या पदवीच्या प्रमाणपत्रापेक्षा व्यवहारातलं प्राविण्य हे कैक पटींनी अवगत करायला कठीण असतं. म्हणूनच, ते दुर्मिळ असतं.

“येरागबाळ्याचे काम नोहे” असं जगद्गुरू संत तुकोबारायांनी म्हटलं आहे, त्यांचा गर्भितार्थ आपण समजून घेतला तर बेरोजगारीसारखी समस्या आपल्याला भेडसावणार नाही. दुसऱ्याचं अंधानुकरण न करता ज्यानं-त्यानं स्वत:चा वकुब ओळखावा, मग जीवघेणी स्पर्धा, त्यातून उद्भवणाऱ्या समस्या यांचा त्रासच नाहीसा होईल, हेच तुकोबाराय सांगत असावेत.
आपण मात्र ते समजून न घेता, केवळ ‘घोका आणि ओका’च्या स्पर्धा भरवत बसलो आहोत.

अर्जुन, एकलव्याचा वारसा सांगणारा आपला देश आज तिरंदाजीमध्ये जागतिक स्तरावर स्वत:चं कर्तृत्व का सिद्ध करू शकत नाही? बहिर्जी नाईकांसारखी अत्यंत विलक्षण बुद्धिमत्तेची माणसं आपल्याकडे होती, त्यांच्या बुद्धिमत्तेचा वारसा घडवणारं जगातलं सर्वोत्कृष्ट हेरखातं आपण का विकसित करू शकलो नाही?

आपल्याकडच्या पालकांनाच आपला खरा बौद्धिक वारसा पुन्हा एकदा सांगण्याची वेळ आली आहे. आपला बौद्धिक परंपरेचा इतिहास आपण पार विसरून गेलो, हीच आपली मोठी घोडचूक झाली आहे.

रामानुजन, भास्कराचार्य, जगदीशचंद्र बोस, रविंद्रनाथ टागोर, राजा रविवर्मा यांच्यावरचे माहितीपट घराघरातून दाखवण्याऐवजी आपण घराघरातून विवाहबाह्य संबंध आणि पाताळयंत्री सासू-सुनांच्या सिरीयल्स दाखवायला लागलो, तिथंच आपण चुकलो. न्यायमूर्ती रामशास्त्री किंवा चाणक्य यांच्या गुणांना मनावर बिंबवणारे उत्तम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले सिनेमे आम्ही केलेच नाहीत, आम्ही सैराट, शाळा, टाईमपास, फॅंड्री यांच्यातच रमलो, तिथंच आपण चुकलो.
कौटिल्याचं अर्थशास्त्र आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत पोचवता आलं असतं. ते केलं असतं, तर शेतकऱ्याला कर्जबाजारीपणही आलं नसतं आणि त्यानं आत्महत्याही केली नसती. आपण ते केलंच नाही.
शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाचा चौरंग केला, खंडोजी खोपड्याचे हात-पाय कलम केले, त्यांच्या कठोर शिस्तीचं आणि नैतिकतेचं महत्व आपण आपल्या मुलांना नीट शिकवलं का? ते शिकवलं असतं तर निर्भया किंवा कोपर्डी प्रकरण झालं असतं का? आपण ते केलंच नाही.
मग, आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या पिढीला उत्तमरित्या घडवण्यासाठी आपण नेमकं केलं तरी काय?एक पालक म्हणून आपण आपली जबाबदारी नीट ओळखली आहे का?

गेलेली वेळ पुन्हा परत येईल का? येणार नाही.
डोळ्याला उघडपणे दिसणारी वस्तुस्थिती आणि आपला भूतकाळ यांचं नातं जोडण्याचा थोडासा तरी प्रयत्न करूया. आपल्याला ते प्रयत्नांनी जमेल.
व्यवहारात चतुर, प्रामाणिक, तत्वनिष्ठ आणि शिस्तप्रियता या चार गोष्टींचा अंगिकारच आपल्या देशाला जागतिक महासत्ता बनवेल…?

बाप माणूस!*

*#बाप माणूस!* 

साधारणपणे ५-१० वर्षांपूर्वीचा तो प्रसंग! दिवाळीची सुट्टी लागली म्हणून गावाकडे निघालो होतो. दिवाळीमुळे प्रचंड गर्दी होती. माझ्या शेजारी जागा रिकामी होती. एक पन्नाशीला टेकलेला मनुष्य घाम पुसत माझ्या जवळ आला. जागा रिकामी आहे का चौकशी केली. मी अगदी मनमोकळेपणाने बॅग वर टाकून जागा करून दिली. 

गाडी नगरहून निघाली आणि गावाच्या दिशेने निघाली. माझं तरुण वय आणि हातात अग्निपंख पुस्तक पाहून न राहवून त्या सद्गृहस्थाने माझी चौकशी केली. मी सांगितलं की कॉलेजमध्ये आहे. सुटीला घरी जातोय. गप्पांच्या ओघात ती व्यक्ती शिक्षक असल्याचं कळलं! मी पण उत्सुकतेने शाळेतल्या गमतीजमती विचारायला सुरुवात केली आणि त्यांनी पण त्या मोठ्या आवडीने सांगायला सुरुवात केली. बोलता बोलता त्यांनी मला विचारलं - तू कोणता व्यवसाय करणार? मी म्हटलं - मला व्यवसाय करायला आवडेल पण मला शिकवायला आवडतं! 

माझ्या उत्तरावर त्यांनी कुतूहलाने माझ्याकडे पाहिलं. आणि म्हणाले - "शिक्षक होणं ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी पाठ हे स्वतः जगावे लागतात आणि विद्यार्थ्यांना जगायला शिकवावे लागतात." कोणत्या तरी धड्याचा संदर्भ देऊन हे त्यांनी सांगितलं. वाक्य आवडलं म्हणून लक्षात राहिलं. पण पुढे त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळेल याची अजिबात कल्पना नव्हती. 

आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. नगरपासून ४०-५० किलोमीटर वर गाव होतं त्यांचं! गेली २० ते २५ वर्षे एसटी ने अप डाऊन करुन नोकरी केली होती. माणूस प्रचंड मेहनती आणि प्रामाणिक होता. पोरगा नुकताच १२ वी झाला. मार्क पण चांगले पडले होते. नगरला यायला त्रास होऊ नये म्हणून सरांनी मुलाला दुचाकी गाडी घेऊन दिली होती. साहजिकच पोराच्या हुशारीचं कौतुक बापाच्या डोळ्यातून पाझरत होतं. 

गावं १० किमीवर आलं तसा सरांनी मुलाला एसटी स्टॅन्डवर घ्यायला ये असा फोन केला. पोराने पण लगेच तत्परता दाखवून येतो असं उत्तर दिलं आणि एसटी स्टॅण्डकडे निघाला. गाव आलं एसटी थांबली. तसा पोरगा आणि त्याचे मित्र सरांना घेण्यासाठी गाडीवर आले होते. 

सर खाली उतरले. नवीन कोऱ्या गाडीवर एका राजकीय पक्षाचे चिह्न आणि त्याचा फोटो चिकटवलेला दिसला. पुढच्या क्षणी एसटी स्टॅन्ड मुस्काडात मारल्याचा आवाजाने चपापले! सरांनी पोराच्या जोरदार कानाखाली वाजवलीं होती. सरांचा आवाज आणि राग दोन्ही चढत होते. " तुझा बाप गेली वीस वर्षे तुझ्या बुडाखाली गाडी असावी या करिता झिजतोय आणि तू मात्र नव्या कोऱ्या गाडीवर अनोळखी नेत्याचा फोटो लावून हिंडतोय? तुझ्या बापापेक्षा भारीय का रे भडव्या तो? 

तो पण जिवंत आहे आणि तुझी आई आणि बाप पण! मग आईबाप विसरुन तुला त्याचा फोटो का लावावा वाटला? राजकारण करायचंय जरुर कर! मास्तरांचा पोरगा मास्तर व्हावा असा काही नियम नाही. पण कर्तृत्व असं घडवं की नेता तुझ्या दारात येऊन म्हंटला पाहिजे - "साहेब माझ्या पक्षातून तुम्ही निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा आहे. ह्या वेळी तिकीट तुम्हाला द्यायचं ठरलं आहे." 

सरांच्या डोळ्यातून आग आणि मुखातून शिशाचा रस कानात ओतला जात होता.- " जो पोरगा त्याच्या आईबापाच्या रक्ताच्या कमाईला कुणा नेत्याच्या प्रचाराचं लेबल लावत असेल तर ती औलाद हरामखोर म्हणावी लागेल. अशी औलाद असण्यापेक्षा नसलेली परवडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी पण स्वराज्याचं तोरण बांधलं पण माता आणि मातृभूमीला वंदन करून, शिवशंकराला साक्षी ठेवून! आणि पित्याला विश्वासात घेवून! लाचारी आणि लाळघोटेपणा करून नाही. घरी येईपर्यंत जर गाडीवरची ठिगळ जर निघाली नाहीत तर गाडी जाळून टाकेन. " असं म्हणून सर पायीचं घराकडे निघाले. 

मी म्हटलं साधी गोष्ट होती. जी घरी पण समजावून सांगणे शक्य होते. इतकं आक्रमक होण्याची गरज नव्हती. सर पायीच घरी निघाले. तसं पोराने आधी भराभर स्टिकर फाडले. पुढचं दृश्य फार पाहण्या सारखं होतं. सर फक्त त्यांच्या मुलाला बोलले पण त्याच्या मित्रांना पण ते लागलं होतं. पोरांनी भराभर स्टिकर फाडली. सरांच्या शब्दांत दम होता. उद्या हा प्रसंग आपल्या कुणाच्या वाट्याला येणार नाही असं नाही. आणि त्यात चूक काहीच नाही. पोरांनी नीट घरचा रस्ता धरला. पोरगा मात्र घरी जायला धैर्य एकवटत होता. 

सरांनी स्वतःच्या मुलाच्या थोबाडात वाजवून वेदना मात्र सगळ्यांच्या हृदयात जागवल्या होत्या. पाठ जगणे कशाला म्हणतात हे सरांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं होतं. गप्पा आणि अचानक घडलेला पुढचा प्रसंग यात सरांचं नाव विचारायचं राहून गेलं. इतक्यात कंडक्टरने डबल बेल मारली आणि गाडीतल्या अनेक बापांच्या मनात एक नवीन विचार आणि पोरांच्या मनात कृतज्ञतेच्या जाणिवा जाग्या करून गाडी गावाच्या दिशेने निघाली.
वेळीच घातलेला एक टाका पुढचे शंभर टाके वाचवतो ते असं! नातं वृद्धाश्रमात पोहोचण्या इतकं फाटल्यानंतर त्याला सहानुभूतीचे टाके घालण्यापेक्षा वेळीच जबाबदारीच्या जाणिवा थोडं कठोर होऊन जाग्या केलेल्या उत्तम नाही का? 
- श्री. अमेय कानडे 9763776339
© लेखात कोणताही बदल न करता पोस्ट फॉरवर्ड करायला हरकत नाही. 
#आवडला तर नक्की शेअर करा!

लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट पुर्णपणे वाचा*

.     👇 *लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट पुर्णपणे वाचा*👇
*(खरोखर सकारात्मकतेचे अप्रतिम उदाहरण आहे)*

एक होती चिमणी आणि एक होता कावळा. 

चिमणीचं घर होत मेणाच, याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. 

एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. 

झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. 

कावळयाच घर होत शेणाच, ते गेले  पाण्यात वाहून, कावळा काकडला. आता कुठे जाव बर? एवढयात त्याला आठवलं, 

चिमणीच घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. 

पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. 'चिऊताई, चिऊताई, दार उघड !' 

चिमणी आतून म्हणाली 'थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते'

 थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली 'चिऊताई, चिऊताई, दार उघड !' 

चिमणी आतून म्हणाली 'थांब माझ्या बाळाला झोपवते' इकडे कावळयाला खूप भूक लागली होती. 

पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला पण चिमणीने काही केल्या दार उघडले नाही.

👉 *गोष्टीचा पुर्ण केलेला उत्तरार्ध -* 

      चिमणीचे सगळे काम आटोपले
ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की, 

अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. 

तिला विलक्षण अपराधी वाटलं. 

तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. 

ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता.

'गेला असेल कुठेतरी... येईल परत' 

…. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली. 

मात्र, रात्र मावळली... दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. 

चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … 

कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची …… 

तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं... 

अनेक दिवस उलटले ...

चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. 

मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. 

एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला... 

तो 'कावळ्याचा' आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला काय आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. 

तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय! 

कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. 

कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, 

'या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?' 

कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,
- 'तुला राग नाही आला माझा?'

- का यावा? 

- मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?

- छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. 

तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती 

माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. 

माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोनीही गोष्टी 'अतिक्रमणा सारख्याच' घडल्या असत्या नाही का?

 आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर 'अतिक्रमण' करण चूकच नाही का?

 म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.

- मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.

- चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. 

जेव्हा आपण एकट आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची . 

मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या 'घरट्यात'… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'माझ्या माणसांमध्ये'

चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला -

*- चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब न करता.*

चिमणीचे डोळे पाणावले... भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे... 

पण आज तिच्या पंखात पूर्वीइतक बळ राहिलं नव्हतं....

आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय. 

- म्हणजे ?

- म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या ध्यानिच नसतं अगं. 

ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीण आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात...

*त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही*

…. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो 

*…'थांब मला जरा  करिअर करु दे.... थांब जरा मला आता घर घ्यायचय... थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब मला काम आहे ... थांब मला विश्रांती घ्यायची आहे ... थांब जरा मला आता ….' आणि मग ही जंत्री वाढतच जाते.*

त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात... त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं... आपल्या ते लक्षात नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा …. 

आपण फार एकटे झालेले असतो.... !!

- आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर? 

🌸मला कोणाचीच  गरज नाही हा अहंपणा बाळगु नका 🌸

- वेळीच *'टकटक'* ऐकायला शिका.
वेळ प्रत्येकाची येते।।.
🌞🙏⛳

गौतम बुद्ध के सुविचार •*

*• गौतम बुद्ध के सुविचार •*

.... जो गुजर गया उसके बारे में मत सोचो और भविष्य के सपने मत देखो
केवल वर्तमान पे ध्यान केंद्रित करो ।
                   *– गौतम बुद्ध*

.... आप पूरे ब्रह्माण्ड में कहीं भी ऐसे व्यक्ति को खोज लें जो आपको आपसे ज्यादा प्यार करता हो, आप पाएंगे कि जितना प्यार आप खुद से कर सकते हैं उतना कोई आपसे नहीं कर सकता।
                   *– गौतम बुद्ध*

.... स्वास्थ्य सबसे बड़ा उपहार है, संतोष सबसे बड़ा धन और विश्वास सबसे अच्छा संबंध।
                  *– गौतम बुद्ध*

.... हमें हमारे अलावा कोई और नहीं बचा सकता, हमें अपने रास्ते पे खुद चलना है।
                    *– गौतम बुद्ध*

.... तीन चीज़ें ज्यादा देर तक नहीं छुपी रह सकतीं – सूर्य, चन्द्रमा और सत्य
                   *– गौतम बुद्ध*

.... आपका मन ही सब कुछ है, आप जैसा सोचेंगे वैसा बन जायेंगे ।
                   *– गौतम बुद्ध*

.... अपने शरीर को स्वस्थ रखना भी एक कर्तव्य है, अन्यथा आप अपनी मन और सोच को अच्छा और साफ़ नहीं रख पाएंगे ।
                   *– गौतम बुद्ध*

.... हम अपनी सोच से ही निर्मित होते हैं, जैसा सोचते हैं वैसे ही बन जाते हैं। जब मन शुद्ध होता है तो खुशियाँ परछाई की तरह आपके साथ चलती हैं ।
                    *– गौतम बुद्ध*

.... किसी परिवार को खुश, सुखी और स्वस्थ रखने के लिए सबसे जरुरी है - अनुशासन और मन पर नियंत्रण।
अगर कोई व्यक्ति अपने मन पर नियंत्रण कर ले तो उसे आत्मज्ञान का रास्ता मिल जाता है
                   *– गौतम बुद्ध*

.... क्रोध करना एक गर्म कोयले को दूसरे पे फैंकने के समान है जो पहले आपका ही हाथ जलाएगा।
                    *– गौतम बुद्ध*

.... जिस तरह एक मोमबत्ती की लौ से हजारों मोमबत्तियों को जलाया जा सकता है फिर भी उसकी रौशनी कम नहीं होती उसी तरह एक दूसरे से खुशियाँ बांटने से कभी खुशियाँ कम नहीं होतीं ।
                   *– गौतम बुद्ध*

.... इंसान के अंदर ही शांति का वास होता है, उसे बाहर ना तलाशें ।
                  *– गौतम बुद्ध*

.... आपको क्रोधित होने के लिए दंड नहीं दिया जायेगा, बल्कि आपका क्रोध खुद आपको दंड देगा ।
                  *– गौतम बुद्ध*

.... हजारों लड़ाइयाँ जितने से बेहतर है कि आप खुद को जीत लें, फिर वो जीत आपकी होगी जिसे कोई आपसे नहीं छीन सकता ना कोई स्वर्गदूत और ना कोई राक्षस ।
                  *– गौतम बुद्ध*

.... जिस तरह एक मोमबत्ती बिना आग के खुद नहीं जल सकती उसी तरह एक इंसान बिना आध्यात्मिक जीवन के जीवित नहीं रह सकता ।
                 *– गौतम बुद्ध*

.... निष्क्रिय होना मृत्यु का एक छोटा रास्ता है, मेहनती होना अच्छे जीवन का रास्ता है, मूर्ख लोग निष्क्रिय होते हैं और बुद्धिमान लोग मेहनती ।
                   *– गौतम बुद्ध*

.... हम जो बोलते हैं अपने शब्दों को देखभाल के चुनना चाहिए कि सुनने वाले पे उसका क्या प्रभाव पड़ेगा,
अच्छा या बुरा ।
                  *– गौतम बुद्ध*

.... आपको जो कुछ मिला है उस पर घमंड ना करो और ना ही दूसरों से ईर्ष्या करो, घमंड और ईर्ष्या करनेवाले लोगों को कभी मन की शांति नहीं मिलती ।
                   *– गौतम बुद्ध*

.... अपनी स्वयं की क्षमता से काम करो, दूसरों निर्भर मत रहो ।
                *– गौतम बुद्ध*

..... असल जीवन की सबसे बड़ी विफलता है हमारा असत्यवादी होना ।
                *–  गौतम बुद्ध.*

मनव्यवस्थापन

*मनव्यवस्थापन!*
  ☺

आहे त्याचा स्वीकार केल्यास नव्यान्नव टक्के चिंता पळुन जातात.
*वेदनांना विचारांपासुन तोडलं की चिंता पळुन जाते!* 

*1) भुतकाळात घुटमळणे बंद करा –* 

बसल्या बसल्या ना, आपल्या डोक्यात उगाच चक्र सुरु असते, 
- “दहा वर्षांपुर्वी मी चांगला अभ्यास केला असता, तर आज मी ही खुप मोठ्ठा ऑफीसर राहीलो असतो.” 
- “सात वर्षांपुर्वी मी प्लॉट घ्यायला हवा होता, तेव्हा मी सुवर्णसंधी सोडली.” 
- “त्यावेळी मी त्यांच्याशी असे वागायला नको होते! खुप वाईट आहे मी!” 
- “मी खुप कमी पगारावर काम करायला तयार झालो, मी असे नव्हते करायला पाहीजे.”
 व्हायच्या त्या घटना घडुन गेल्या, 
टाईममशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा, फालतुमध्ये खर्च होणार, त्यापेक्षा 
*भुतकाळातल्या, ह्या सर्व चांगल्या वाईट घटना, विसरुन गेलेलं, बरं!

*2)इथे प्रत्येक जण अद्वितीय आहे! –* 

बहुतांश दुःखांच मुळ हे तुलनेत असतं,

*ह्या जगात प्रत्येक गोष्ट एकमेवअद्वितीय आहे,*
गुलाब दिसायला सुंदर असतो, पण म्हणुन मोगर्‍याचं महत्व कमी होत नाही, त्याचा सुगंध ही त्याची ओळख! त्या दोघात डावं-उजवं अशी तुलना करता होईल का? प्रत्येक फुल अद्वितीय आहे.
आता यात डावं उजवं करुन, कशाला दुःखी व्हायचं! प्रत्येकाचा चेहरा एक दुसर्‍यापासुन वेगळा आहे, म्हणुन ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती एकमेव अद्वितीय आहे, तुम्हीपण!..

*3) ‘आयुष्य कशासाठी’ याचं उत्तर शोधा. –*

आयुष्य निसर्गाने आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे, 
आयुष्य सतत आनंदी राहण्यासाठी आहे, आयुष्य उत्साहाने भरभरुन जगण्यासाठी आहे, आयुष्य भव्यदिव्य स्वप्नं बघण्यासाठी आणि ती स्वप्ने मनमुरादपणे जगण्यासाठी आहे, 
*आयुष्य आपल्या आणि इतरांच्या चेहर्‍यावर हसु फुलवण्यासाठी आहे!*

जीवनाचा प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे, मनातले सर्व अपराधी भाव, भुतकाळ-भविष्यकाळ, काल्पनिक जबाबदार्‍यांचे ओझे, सगळे सगळे फेकुन द्या, मोकळे आणि रिते व्हा, प्रत्येक क्षणाला, निरापराध वृत्तीने, निरागसपणे सामोरे जा!

माणसाला तीन गोष्टी जास्त त्रास देतात, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी ह्या तीन गोष्टी सापडतील, 

 अ) अपेक्षा
 ब) अपुर्ण स्वप्ने,
 क) ध्येयप्राप्ती नंतर येणारा रिक्तपणा!

*बहूदा आपण भला ऊसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी ! याच विचारात असतो.* 
तो कसा सुखी आहे, 
ती कशी मस्त जगते, 
त्याच आयुष्य आरामशीर आहे,  माझ्याकडे हे का नाही, या अपेक्षेने, तुलनेने दु:ख्खी होत तर नाही ना !

बघा! किती गंमतीशीर आहे हे, समजा, एखाद्याचे लग्न होत नाही, तेव्हा तो किती परेशान असतो, उठता-बसताना, जेवताना, झोपताना एकच ध्यास असतो, लग्न-लग्न-लग्न! नकळत हाच विचार, चिंता बनुन, त्याच्या आत्म्याला डाचु लागतो, त्याच्या दुःखाचं कारण बनतं, मग हास्य गायब होतं, चित्त थार्‍यावर राहत नाही, चिडचिड वाढते. स्वप्नप्राप्तीकडे रोज वाटचाल करायची पण मनावर जखम न होवु देता!, ह्याला म्हणतात, सुखी जीवन!

आणि समजा, एके दिवशी लग्न झालेच, (प्रत्येकाचे होतच असते,) मग अचानक आयुष्यातले थ्रील खतम! पुन्हा सप्पक आयुष्य सुरु, जॉब लागु दे, जॉब लागु दे म्हणुन तळमळलो, आणि जॉब लागला, आता थोड्याच वर्षात त्या जॉबचा कंटाळा यायला लागतो, एक प्रकारचा रिक्तपणा येतो, 

*आयुष्य कशासाठी? जीवनाचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी, मनाच्या आकाशात हे उत्तर जेव्हा गवसेल, तेव्हा नैराश्य, उदासीनता जवळपास फटकणार पण नाहीत!* 

*4) सेवा करणार्‍याला आत्मिक समाधान मिळते. -*

बघा! किती मजेशीर आहे हे,

- अगरबत्ती स्वतः हवेत विरुन जाते, पण वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरवते,
- दिव्याची वात स्वतः नष्ट होते, पण तेजाने घर उजळुन टाकते.
काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ धावत असतो, पण खरे समाधान कुठे आहे? 
आपल्यात असलेल्या गुणांचा, शक्तीचा वापर आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना, अगदी अनोळखी लोकांना सुखी, आनंदी बनवण्यासाठी करणार्‍यांचं जीवन खरं सार्थ झालं, असं म्हणता येईल.

ह्याच चार सुत्रांचा मिळुन बनतो, 
*लॉ ऑफ अट्रेक्शन!
मनाच्या तळाशी जाऊन सुखाचा शोध घेऊ पाहणारया,  
सगळ्यांचे आयुष्य, सुखी, समाधानी आणि समृद्ध होवो             *डॉ.मुक्तेश्वर पारवे*

मेनोपॉज..सिर्फ नामही काफी है..!!"

"मेनोपॉज..सिर्फ नामही काफी है..!!"

"डॉक्टर हल्ली खूप कंटाळा येतो सगळ्या गोष्टींचा..सारखी चिडचिड होते..काही करावसंच वाटत नाही"

"डॉक्टर सगळं अंग दुखतं सतत..तोंडाला चव नाही..रात्री झोप लागत नाही"

"डॉक्टर कंबरदुखीने त्रस्त झालीये गेले काही महिने..खरंतर सगळेच सांधे दुखतायेत..सारखा 'विकनेसपणा' वाटतो"

"डॉक्टर गेले सहा महिने दर १५ दिवसांनी पाळी येतेय आणि खूप जास्त ब्लीडींग होतंय"

"डॉक्टर सध्या माझं इतकं प्रचंड वजन वाढतंय..कितीही व्यायाम ,डाएट केलं तरी उपयोग च होत नाही..ब्रेस्ट पण खूप दुखतात"

या सगळ्या पेशंट मध्ये एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे हा त्रास मेनोपॉज मुळे आहे याबद्दल ह्या पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांची पूर्ण खात्री पटलेली असते. 
आपल्या समाजात सध्या चाळीशीच्या वरच्या कोणत्याही आरोग्य समस्येचे खापर मेनोपॉज वर फोडण्याची फॅशन च आली आहे.मग समस्या कोणतीही असो..हे अतिशय चुकीचे आणि घातक  ठरू शकते.खरंतर  स्त्री चे मेनोपॉज चे वय हे साधारणपणे ४८-४९  आहे,कधी कधी ५०-५१ पर्यंतही पाळी चालू राहू शकते .पण ५० नंतर पाळी चालू राहिल्यास अतिशय नियमितपणे स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी करून घ्यायलाच हवी.

चाळिशीनंतर स्त्रियांना आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात .यामागे आत्तापर्यंत शरीराकडे केलेलं अक्षम्य दुर्लक्ष हा महत्त्वाचा भाग असतो.योग्यआहार आणि व्यायाम याचा कधीच विचार न केल्यामुळे वाढलेले वजन,गरोदरपणात आणि प्रसुतीनंतर रक्तवाढीच्या आणि कॅलशियम च्या गोळ्या नियमित न घेतल्यामुळे शरीरात आलेला कमकुवतपणा,घरच्यांनी योग्य तो आधार न दिल्यामुळे आलेले मानसिक नैराश्य या सगळ्या गोष्टी चाळिशीनंतर स्त्रीच्या अनारोग्याला कारणीभूत असतात.
मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या जनन संस्थेचे काम हळू हळू संथ होत जाते आणि सरतेशेवटी पूर्ण थांबते.हा बदल अतिशय सावकाश आणि स्थिर गतीने होतो.त्यामुळे याचे शरीरावर कोणतेही अतितीव्र परिणाम शक्यतो दिसत नाहीत.
नॉर्मल मेनोपॉज मध्ये पाळी उशिरा उशिरा येत जाते आणि ब्लीडींग कमी कमी होत जाते.हा आणि हाच पॅटर्न मेनोपॉज मध्ये नॉर्मल समजला जातो.आपल्या समाजात दर १५ दिवसांनी पाळी येऊन प्रचंड रक्तस्त्राव होणाऱ्या स्त्रीला हा मेनोपॉज चा त्रास आहे..होणारच असं तिच्या आजूबाजूचे निकटवर्तीय उर्फ स्वघोषित  वैद्यकीय तज्ञ(!!) पटवून देतात आणि मग तीसुद्धा निमूटपणे हे दुखणं अंगावर काढत राहते.
साधारणपणे मेनोपॉज मध्ये काय होणं अपेक्षित आहे हे बघूया.
१)पाळी उशिरा उशिरा येऊ लागणे,तरीही रक्तस्राव नॉर्मलच असणे.
२)थोडेफार मूड्स बदलणे,कधीतरी निराश वाटणे.
३)'hot flashes' म्हणजे अचानक शरीराच्या वरच्या भागाला खूप घाम येतो आणि खूप गरम वाटते.हा प्रकार पाळी पूर्णपणे थांबल्यावर १-२ वर्षात होणं अपेक्षित आहे.पण काही स्त्रियांना आधी जाणवू शकतो.
४)योनीमार्गामध्ये कोरडेपणा जाणवणे तसेच लैंगिक इच्छा कमी होणे.
५)योनीमार्गाच्या अतिकोरडेपणामुळे कधी कधी त्या भागात खाज सुटणे किंवा  वारंवार लघवीचा संसर्ग होणे.
६)शरीरातील हॉर्मोन चे प्रमाण कमी झाल्यामुळे कॅल शियम ची कमतरता जाणवायला लागते आणि स्नायू आणि हाडेदुखीची सुरवात होऊ शकते.
७)काही स्त्रियांना झोप न येणे,केस गळणे,डोक्याच्या त्वचेचा कोरडेपणा अश्या समस्या येऊ शकतात.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या समस्यांवर अतिशय प्रभावी असे उपाय उपलब्ध आहेत.कारण नसताना सहन करत राहायची काहीच गरज नाही.फक्त वैद्यकीय सल्ला वेळेवर घेऊन त्याचे तंतोतंत पालन करायला हवे.

आता एक अतिशय महत्वाचा मुद्दा..
मेनोपॉज चं वय साधारणपणे ४८-४९ वर्षे आहे.आयुष्याच्या या टप्प्यावर इतरही अनेक व्याधी शरीरात प्रवेश करतात.मधुमेह,रक्तदाब ,थायरॉईड यासारख्या समस्या चाळिशीनंतर सुरू होतात.यासाठी च्या तपासण्या नियमितपणे करणे गरजेचे असते.या तपासण्या बहुतेक स्त्रिया अजिबातच करत नाहीत.आणि मग होणाऱ्या त्रासाला मेनोपॉज चे नाव देऊन मोकळ्या होतात.

पाळीचे त्रास,सतत वाढणारे वजन,अंगावर सूज,त्वचेचा कोरडेपणा,केस गळणे या सर्व गोष्टी थायरॉईड च्या समस्येमध्ये दिसू शकतात.
योनीमार्गात सतत खाज सुटणे,लघवीचा जंतुसंसर्ग,अशक्तपणा,शरीराचा विशेष करून पायाचा दाह होणे,वजन वाढणे ही लक्षणे मधुमेहाचीही असू शकतात.
छातीत धडधडणे,एकदम घाम येणे,डोकेदुखी,मुंग्या येणे,मूड्स चे बदल हे वाढलेल्या रक्तदाबामुळेही किंवा क्वचित हृदयरोगाचे लक्षण असू शकते.
संधीवाताची सुरुवात सुद्धा साधारण चाळिशीनंतर होऊ शकते.
त्यामुळे स्वतःच हा त्रास मेनोपॉज चा आहे असे निदान न करता डॉक्टरांचा सल्ला वेळेत घ्यावा हे उत्तम!!
मेनोपॉज चा त्रास भारतीय बायकांना कमी होतो अशी वैद्यकीय क्षेत्रात आत्तापर्यंत समजूत होती .एकत्र कुटुंब पध्दतीमुळे आपल्या स्त्रियांना कौटुंबिक आधार उत्तम असायचा,मानसिक एकटेपणा येत नसे.बदलत्या काळानुसार कुटूंबाचा आकार छोटा होत गेल्याने स्त्री हल्ली मेनोपॉज च्या वयात खूप एकटी पडू लागली आहे .घरट्याबाहेर पडलेली मुलं आणि कामात मग्न नवरा अशी परिस्थिती असल्याने या स्त्रिया फार लौकर नैराश्याने घेरल्या जातात आणि मग निराश मन वेगवेगळ्या व्याधींना शरीरात लगेच आमंत्रण देतं.

तर असं आहे हे मेनोपॉज पुराण..

या सगळ्या मेनोपॉज प्रकरणाला योग्य रीतीने कसं हाताळायचं ते आपण पुढच्या लेखात बघूया!

डॉ शिल्पा चिटणीस जोशी
स्त्रीरोगतज्ञ व वंध्यत्वतज्ञ
कोथरूड
पुणे

नागपूर

नागपूर वरून महत्वाची बैठक संपवून गुरुजी व मी साधारण रात्री 11.30 च्या सुमारास पुण्यात पोचलो.पुण्यातील जेष्ठ कार्यकर्ते पुण्यात न्यायला हजरच होते.गाडीत बसलो आणि गुरुजी म्हणाले सरळ स्वारगेट ला सोडा.
खरं सांगायचं तर गुरुजींच्या सोबत इतक्या लांब मी प्रथमच गेलो होतो.दिवसभर भयानक दगदग झाल्याने शरीर थकलेलं व डोळे झाकत होते.
पण सोबत गुरुजी असल्याने तसे जाणवून देत नव्हतो.
मनात म्हटलं पुण्यात आल्यावर निदान जेवायला तरी मिळेल मात्र गुरुजी सरळ स्वारगेट ला चल म्हणल्यावर मनातल्या मनात खूप दुःख झाले पण पर्याय नव्हता.
पुण्यातील कार्यकर्ते गुमान गाडी चालवत स्वारगेट पर्यंत आले.
12.30 होत आले आणि गुरुजी या वेळेत सुद्धा कमालीचे उत्साही होते.12.30 ते ला स्वारगेट बस स्थानकावर सांगली गाडी पहायला अक्षरशः धावत होते आणि मी त्यांच्या मागे.
एखादी गाडी सुरू झाली की माझ्याकडे रागाने पाहत ..अरे धाव जरा,बघ कोणती एस.टी. आहे असे म्हणायचे आणि असल्या अवस्थेत मी धावत बस पहायचो.
गुरुजींना बस मधील विलक्षण ज्ञान होते.एशियाड बस ते मुद्दाम सोडून देत होते...म्हणायचे या बस ची चाल हत्तीची आणि भाडे विमानाचे असते.
मला नवल वाटायचे या गोष्टीचे.आयुष्यभर बस शिवाय त्यांनी प्रवास केला नव्हता आणि बस मधील कंडक्टर जवळची सिट ही गुरुजींच्या बसण्याची हमखास जागा.
साधारण 20 मिनिट धावपळ करत अखेर सांगली बस मिळाली आणि आम्ही बसलो.
अर्थात गुरुजींनी मला तिकीट काढून दिले नाहीच..स्वतः काढले व ते कॅडक्टर जवळ बसले आणि मी असाच कुठेतरी मागे.
मला कऱ्हाड जवळ महामार्गनजीक उतरायचे होते म्हणून मी उंब्रज गेल्यानंतर उठून कंडक्टर जवळ उभा राहिलो.
गुरुजी यावेळी सुद्धा जागेच होते.क्षणात माझ्याकडे पाहत बोलले...तुला इथे उतरावे लागेल नाही का ?
मी होय म्हणालो.....
एव्हाना कंडक्टर साहेब बाजूच्या सीटवर झोपी गेले होते त्यामुळे मी गुरुजींच्या जवळ बसलो.
3 वाजून गेलेले होते.
मी म्हणालो आता गुरुजी सकाळी कुठे बैठक आहे ..?
गुरुजी म्हणाले आज मिरज शहर बैठक आहे.
4 पर्यंत पोचेन मी सांगलीत...बरोबर 5 वाजता घाटावर व्यायामाला जाणार...!
हे ऐकून मला धक्काच बसला.
काल सकाळी सांगली सोडून आम्ही अवघी दगदग सहन करतोय...जेवण,पाणी वेळेवर नाही...नागपुरात अखंड 4 तास सभा चालली आणि सभा संपली तशी परतीची यात्रा करत आम्ही बस मधून सांगलीला येतोय.माझे शरीर,डोळे अक्षरशः इतके थकले होते की कधी एकदा झोपतोय असे झाले होते आणि किमान 10 तास झोपल्याशिवाय उठायचे नाही असेही मन म्हणत असताना गुरुजी म्हणतात बरोबर 5 वाजता व्यायामाला घाटावर जाणार...!

मी धाडस करून विचारले....गुरुजी थोडीतरी विश्रांती घ्यायची नाही का...?
यावर गुरुजी उत्तरले...कसली विश्रांती..?

एहे.. बिलकुल नाही.हा शब्दच नामंजूर आहे.
तिकडे शिवछत्रपती संभाजी महाराज,आई तुळजाभवानी माझी वाट पाहत असताना मी विश्रांती घ्यायचे हे महापाप आहे.
एक लक्षात ठेव,शिवाजी महाराजांचे काम करायचे म्हणजे दररोज व्यायाम झालाच पाहिजे.
ज्या दिवशी व्यायाम न करता अन्न खाईल ते विष्ठेसमान समजायचे.
जवानी आणि तुमची खरी ओळख व्हायची आहे....पुरात पोहणे, हजार हजार जोर मारणे,कुस्ती खेळणे,घोड्यावर बसणे, हे खऱ्या जवानीचे लक्षण आहे...आपल्या हिंदू समाजाला याचा विसर पडला आहे,ते जागे करायचे काम म्हणजे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आहे.
दररोज व्यायाम करणारा खरा धारकरी आहे....शरीराचा मध्यप्रदेश (पोट) नेहमी छातीच्या आतच असला पाहिजे तरच शिवाजी महाराज की जय म्हणायचा अधिकार आहे......

पहाटे 3 वाजता एकदम उत्साही आवाजात गुरुजींचे हे बोलणे ऐकून आपण जवान असल्याची लाज वाटू लागली.एक क्षण पोटाकडे नजर गेली,आणि जरा आत ओढले....

जीवनाचा फार मोठा मंत्र मला मिळाला.ज्या दिवशी व्यायाम नाही त्या दिवशी खाल्लेलं अन्न विष्ठेसमान.... मध्यप्रदेश आतच पाहिजे..... वयाच्या सत्तरी ओलांडलेले गुरुजी आजही मनाने किती तरुण होते याची जाणीव झाली.
ना झोपेची आसक्ती ना अन्न,पाण्याची गरज...उरात केवळ शिवाजी महाराज संभाजी महाराज घेऊन जीवन जगत आमच्यासारख्या कित्येकाना त्यांनी स्वतःच्या कृतीतून फार मोठी शिकवण दिली ज्याच्या जीवावर आम्ही आजही यशस्वी जीवन जगतोय.

कऱ्हाड आले.मी पाया पडून निघालो...माझ्याकडे पाहत गुरुजी म्हणाले....मध्यप्रदेश छातीच्या आतच पाहिजे..... मी हसलो.
महामार्गावर सुसाट धावणाऱ्या गाड्या होत्या आणि माझे मन त्यापेक्षाही जास्त धावत होते विचारांच्या लाटेत...

- बहिर्जी

लक्ष्मीची पावलं

"लक्ष्मीची पावलं" --------

लहानशी गोष्ट आहे.रात्री साडेनऊचा सुमार, एक पोरगा एका चपलेच्या दुकानात शिरतो. गावाकडचा टिपीकल. हा नक्की मार्केटिंगवाला असणार, तसाच  होता तो, बोलण्यात गावाकडचा लहेजा तरीही काॅन्फीडन्ट. बावीस तेवीस वर्षांचा असेल. दुकानदाराच लक्ष पहिल्यांदा पायाकडे जातं.त्याच्या पायात लेदरचे शूज व्यवस्थित पाॅलीश केलेले ,
दुकानदार - काय सेवा करू ?
मुलगा - माझ्या आईला चप्पल हवीय  टिकाऊ पायजे 
दुकानदार - त्या आल्या आहेत का ?त्यांच्या पायाचं माप ?"_
मुलानी आपलं वाॅलेट बाहेर काढलं त्यात चार घड्या केलेला एक कागद कागदावर पेनानं आऊटलाईन काढलेली दोन पावलं.
दुकानदार - अरे मला मापाचा नंबर चालला असता.  
तसा तो मुलगा एकदम बांध फुटल्या सारखं बोलता झाला "काय माप सांगू साहेब?
माझ्या आयनं जिंदगीभर,पायात कदी चप्पलच घातली नाय, 
आई ऊसतोड कामगार, काटा कुट्यात कुटं बी जात्ये अनवानी ढोरावानी मेहनत केली मला शिकीवलं , 
शिकलो, अन् नोकरीला लागलो. आज पैयला पगार झालाय दिवाळीला गावाकडं चाललोय आईला काय नेऊ? हा सवालच पैदा होत न्हाई. किती वर्सांचं स्वप्न हाई 
पहिल्या पगारातून आयेला चपला नेयाच्या."

दुकानदारान चांगल्या टिकाऊ चपला दाखवल्या आठशे रूपये किंमत होती.
"चालतंय की "त्याची तयारी होती.
दुकानदाराने सहज विचारले;
"किती पगार आहे रे तुला ?"
"सध्याच्याला बारा हजार, रहानं,खानं धरून सात-आठ हजार खर्च होतात इथं,  दोन तीन- हजार आयेला धाडतो."     
अरे मग आठशे रूपये जरा जास्त .....तो मधेच बोलला....पण असुद्या
दुकानदाराने बाॅक्स पॅक करून दिला त्याने पैसे दिले.
आनंदात तो बाहेर निघाला.
एवढी महागाची भेट किंमत करताच येणार नाही त्या चपलांची. ......... पण दुकानदाराने त्याला थांबवल 
थांब जरा! दुकानदाराने अजून एक बाॅक्स त्याच्या हातात दिला.
"ही चप्पल आईला तुझ्या या भावाकडून गिफ्ट 
पहिली खराब झाली की दुसरी वापरायची तुझ्या आईला सांग  आता अनवाणी फिरायचं नाही आणि नाही म्हणायचं नाही."
दुकानदाराचे आणि त्याचे दोघांचेही डोळे भरून आले.

"काय नाव तुझ्या आईचं ?" दुकानदाराने विचारलं.
"लक्ष्मी "तो ऊत्तरला.
दुकानदार लगेचच मागणी करत बोलला,"माझा नमस्कार सांग त्यांना, आणि एक वस्तू देशील मला?
पावलांची आऊटलाईन काढलेला,तो कागद हवाय मला.
तो कागद दुकानदाराच्या हातात ठेऊन आनंदात तो निघून गेला.
तो घडीदार कागद दुकानदाराने  दुकानाच्या देवा-ह्यात ठेवला.
दुकानातील देवा-ह्यातला तो कागद दुकानदाराच्या लेकीनं बघितला.
आणि तिनं विचारलं "काय आहे हे बाबा ?"
दुकानदार दिर्घ श्वास घेऊन आपल्या लेकीला बोलला;
"लक्ष्मीची पावलं" आहेत बेटा
 एका सच्च्या भक्ताने काढली आहेत ती. त्यानं बरकत येते धंद्याला."
लेकीनं , दुकानदाराने आणि सगळ्यांनीच मनोभावे त्या पावलांना नमस्कार केला,......
"लक्ष्मीची पावलं "

अलक

✨ *अलक* =>
*अति लघु कथा*

✨अलक..१.
आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ भांडत होते. आईला विचारल्यावर ती म्हणाली जो माझ्या तीन औषधाच्या गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकड़े मी जाईन. दोन्ही भाऊ खजील झाले.

✨अलक..२.
शिक्षणासाठी दूर देशी गेलेल्या गरीब होतकरु मुलाने आईला पत्र पाठवले त्यात त्याने लिहिले, इथे माझी जेवणाची चंगळ आहे. काळजी करु नकोस. आईने ते पत्र वाचून एक वेळेचे जेवण सोडले कारण पत्राच्या शेवटी मुलाच्या अश्रुने शाई फुटली होती.

✨अलक..३.
आजोबाच्या काठीला हाताने ओढत नेणाऱ्या नातीला पाहून लोक म्हणाले, अग हळू हळू आजोबा पडतील ना. आजोबा हसून म्हणाले, पड़ींन बरा, माझ्याजवळ दोन काठया असताना.

✨अलक..४.
आंब्याच्या झाडावर चढून चोरुन आंबे काढणाऱ्या मुलांच्या पाठीत रखवाल दाराने काठी घातली आणि थोडा वेळ धाक म्हणून त्यांना झाडाला बांधून ठेवले. का कुणास ठाऊक पण त्यानंतर त्या झाडाला कधीच मोहर आला नाही.

✨अलक..५.
ऑफीसातून दमून आल्यावर बाबाने आजीचे पाय चेपून दिल्याचे पाहून नातीने न सांगता बाबाच्या पाठीला तेल लावून दिल्याचे पाहून आजी म्हणाली, ताटातील वाटीत आणि वाटीतलं ताटात.

✨अलक..६.
वडील गेल्यावर भावांनी सम्पत्तीची वाटणी केल्यावर म्हाता-या आईला आपल्या घरी नेताना बहीण म्हणाली, मी खुप भाग्यवान, माझ्या वाटयाला तर आयुष्य आल.

✨अलक..७.
काल माझा लेक मला म्हणाला बाबा मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही कारण तू पण आजी आजोबांना सोडून कधी राहिला नाहीस. मला एकदम वडिलोपार्जित प्रॉपर्टी नावावर झाल्यासारखे फीलिंग आले मला .
   

✨अलक...८.
खूप दिवसांनी माहेरपणाला आलेली नणंद tv सिरीयल पहाता पहाता वहिनी ला म्हणाली वहिनी किती मायेने करता तुम्ही माझे , तर वहिनी म्हणाल्या अहो तुम्ही पण माहेरी समाधानाचे वैभव उपभोगायलाच येता की . सिरीयल मधल्या नणंदेसारखी आईचे कान भरून भांडणे कुठे लावता . मग मी तरी काय वेगळे करते. 
    रिमोट ने tv केंव्हाच बंद केला होता.

✨अलक.. ९.
तिच्या नवऱ्याचा मित्र भेटायला आला आज हॉस्पिटल मध्ये तो खूपच आजारी होता म्हणून. जाताना बळेबळेच
5000 चे पाकीट तिच्या हातात कोंबून गेला , म्हणाला लग्नात आहेर द्यायचाच राहिला होता , माझा दोस्त बरा झाला की छानसी साडी घ्या.
त्या पाकिटा पुढे आज सारी प्रेझेंट्स फोल वाटली तिला.

✨अलक..१०.
आज भेळ खायची खूप इच्छा झाली तिला ऑफिस सुटल्यावर पण घरी जायला उशीर होईल आणि सासूबाईंना देवळात जायचे असते म्हणून मनातली इच्छा मारून धावतपळत घर गाठले तिने , स्वैपाकखोलीत शिरली तर सासूबाई म्हणाल्या हातपाय धू पटकन भेळ केलीय आज कैरी घालून. खूप दिवस झाले मला खावीशी वाटत होती.

✨अलक..११.
 तिन्हीसांजेला सुमतीबाई देवापाशी जपमाळ घेऊन बसल्या होत्या. तेवढ्यात मुलगा कामावरून आला. पाठोपाठ मोगऱ्याचा सुवास आला. सूनबाईच्या केसात फुलला असेल या विचाराने त्यांनी अजूनच डोळे घट्ट मिटून घेतले. थोड्यावेळाने जप झाल्यावर डोळे उघडून पाहतात तर काय मोगऱ्याची ओंजळभर फुले त्यांच्या बालकृष्णासाठी ओटीत वाट पहात होती . त्यांची कूस अजूनही सुगंधीच होती. देवघरातला खोडकर कान्हा गालात हसत होता.
 

 ✨सकारात्मक अलक...

सध्या बाहेर इतके नकारात्मक विचार फैलावतायेत की लोकांचा माणसातल्या चांगुलपणावरचा विश्वास उडत चाललाय.
अश्यावेळी अश्या सकारात्मक अलक ची आणि त्यांचा जास्तीत जास्त प्रसार करण्याची खरोखर आवश्यकता आहे.
जगात सगळेच इतके वाईट नाहीयेत.
चांगल्या माणसांची संख्या वाईटांपेक्षा खूप जास्त असल्यामुळे हे जग सुंदर झालं आहे..

Copy Paste

Copy Paste
वय कितीही होवो,
शेवटच्या श्वासांपर्यंत-- 
" खोडकरपणा " 
जिवंत ठेवणारं नातं
 एकचं असतं  
ते म्हणजे-- मैत्रीचं !

 वाळवंटासारख्या 
रुक्ष जीवनातही 
" हिरवळीचा " 
ओयासिस फुलवणारं
 नातं एकचं असतं 
ते म्हणजे-- मैत्रीचं 

मनांतील कोणतीही
 नाजूक " सल "
 ज्याच्यापुढे उघडी
 करावी असे विश्वासाचं
 नातं एकचं असतं ते
  म्हणजे -- मैत्रीचं 

आपल्याला झालेला
 प्रचंड आनंद --  
प्रथम ज्याच्याबरोबर
 शेअर करुन जल्लोष
 करावा असे वाटते 
अस नातं एकचं असतं 
ते म्हणजे -- मैत्रीचं !

कळत-नकळत
 आयुष्यात घडून गेलेल्या
 " अक्षम्य चुका "
फक्त आणी फक्त
 ज्याच्यापुढे मान्य 
करता येतात अस 
 confession box
 सारखं नातं एकचं असत
 ते म्हणजे -- मैत्रीचं !

म्हणूनच...

" मित्र " नावाची ही 
दैवी देणगी जीवापाड
 जपून ठेवा , कारण
 जीवनांतील अर्धा 
गोडवा हा 
मित्राच्यांमुळेच असतो

आशां

नव्या आशांंनी.....
नव्या आकांक्षांनी.....
नव्या उत्साहाने....
बहरु द्यावा जीवनवेल...
नव्या स्वप्नांमुळे फुटावी
जीर्ण वृक्षासही पालवी
सुखाची नदी वहावी
बहरु द्यावा जीवनवेल....
दुःख पडावे मागे
सुखाचे रेशीम धागे
जोडावेत भक्कम असे,अन्
बहरु द्यावा जीवनवेल...
झाले गेले विसरुनी सारे
संकटांसही जावे सामोरे
प्रेमाची व्हावी बरसात
बहरु द्यावा जीवनवेल....
कोण आपला,कोण परका...
भेदाभेद नको,नको भ्रम अन् शंका
सर्वांना, जीवनी घेवुया सामावुनी
बहरु द्यावा जीवनवेल....
आयुष्य हे भरभर सरेल
प्रेमच जगती नित्य उरेल
क्षण-क्षण,आनंदात जगावे
बहरु द्यावा जीवनवेल.....
क्षणभंगुर आहे,आयुष्य सर्वांचे
मोल जाणावे....क्षणा-क्षणांचे
स्वप्ने सत्यात उतरवावीत....
बहरु द्यावा जीवनवेल....

मानाचा मुजरा..!!*🙏🙏🙏🌹🌹👍

*अगदी मनापासून हार्दिक अभिनंदन.. मानाचा मुजरा..!!*🙏🙏🙏🌹🌹👍👍

*श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे धारकरी विक्रम शिंदे यांची धाकटी बहीण *वर्षा उत्तम शिंदे या आज "नौसेनेत सब लेफ्टनंट" म्हणून नियुक्त झाल्या,* *या आधी त्या पुण्यामधे एका आयटी कंपनीत नोकरी करत होत्या, पण असल्या सुखी नोकरीला झुगारुन देशसेवेसाठी त्या प्रयत्न करु लागल्या, वडील भारतीय सेनेत असल्यामुळे देशसेवेची आग, रग, धग तर रक्तात होतीच, आणि मोठे बंधु* *शिवछत्रपती संभाजी महाराजांचा पाईक त्यांचही मोठ मार्गदर्शन असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आलं,* *नौसेनेच अगदी कडक शिस्तीत असनार ट्रेनिंग त्यांनी शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणात राहुन पुर्ण केलं आणी आज त्या पदावर रुजु झाल्या.. आपल्या सर्व धारकर्‍यांच्या या बहिणीला तुळजाभवानी उदंड यश देवो.*
*वर्षाताई सारखी बहीण या देशवासियांना लाभली आहे हे परमभाग्य आहे...!! देशप्रेम आणि देशभक्ती हे गुण संस्कारातून निर्माण होतात हा वास्तववाद आहे... म्हणूनच तर वर्षाताई शिंदे या आयटी कंपनीतील नोकरीवर लाथ मारून त्या देशसेवेसाठीं नौसेनेत दाखल झाल्या आहेत... त्यांच्या या धाडसी निर्णयाला अगदी मनापासून सलाम....!! वर्षाताई यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे....!!*

*वर्षाताई शिंदे यांचे अगदी अंतःकरणपूर्वक अभिनंदन...!! आणि त्यांच्या भावी दैदीप्यमान कारकिर्दीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा...!!*

*जय हिंद.. वंदे मातरम...!!*

💪⛳👌
*"राष्ट्रात निर्मू अवघ्या शिवसूर्यजाळ"*
⛳🌞🔥🕉🙏🇮🇳⛳

मी काय विसरलो

🙆 *मी काय विसरलो ???* 🙆

घरात टी वी आला,
         मी वाचन विसरलो।
दारात गाडी आली,
          मी चालणे विसरलो|
हातात मोबाईल आला,
           मी पत्रलेखन विसरलो!
कॅलक्युलेटर वापरामुळे,
          पाढेच म्हणणे विसरलो।
एसी च्या संगतीने,
         झाडाखालचा गारवा विसरलो।
शहरात राहील्यामुळे,     
         मातीचा वास विसरलो।
बँकखाती संभाळताना,   
         पैशाची किंमत विसरलो।
बिभत्स चित्रामुळे,
         सौंदर्य पहाणे विसरलो।
कृत्रिम सेंटच्या वासाने,   
        फ़ुलांचा सुगंध विसरलो।
फ़ास्ट फ़ूडच्या जमान्यात,
        तृप्तीची ढेकर विसरलो।
स्वार्थी नाती जपल्यामुळे,   
       खरे प्रेम करणे विसरलो।
क्षणीक सुखाच्या लोभात, 
       सत्कर्मातला  आनंद विसरलो।
सतत धावत असताना, 
      क्षणभर थांबणं विसरलो।
WhatsApp आल्यापासून,
        सुखाने झोपणेही विसरलो !!!!!
           👌 *आयुष्य* 👌 

👍👍👍👍👍👍👍👍👍

नविन पुणेरी पाटी*

*काल एक नविन पुणेरी पाटी*
वाचून बेशुध्द पडता पडता वाचलो !!

"आमच्या येथे १३व्या चा 
स्वयंपाक करून मिळेल!"

पण!

१५ दिवस आधी 
ऑर्डर नोंदविणे आवश्यक
_______________________

*पुणेरी मेडिकल दुकानातील पाटी*

आम्हाला आमच्या कडील 
सर्व औषधांची एक्स्पायरी डेट 
माहित आहे,

पण तुमची माहीत नाही.

तेव्हा कृपया उधार मागू नये.

_____________________

😝😆😝😝
स्थळ : सदाशिव पेठ

एक *वयस्कर* गृहस्थ 
विचारत होते.

इथे आधार कार्ड कुठे काढून मिळतं ?

तर मिळालेलं उत्तर:

कशाला थोडक्यासाठी 
काढताय आता ?

😂😂😂😂😂😂😂
________________________

अमेरिकन : आमच्या देशात 
सगळे लोक उजवीकडून गाड्या
 चालवतात.
तुमच्या कडे काय पद्धत आहे?

😛😛😆

😝😝😃😀😆

👱पुणेकर : तसं काय फिक्स नसतं, 
म्हणजे समोरचा कुठून तडफडतो 
त्याच्यावर आहे.
😜😝😂😝

वकील

_एका वकीलाने आपली विहीर एका शिक्षकाला विकली._
_लेनदेन, कागदी कारवाई सर्व व्यवस्थित झाल्यानंतर दुसर्या दिवशी वकील शिक्षकाकडे गेला._
*वकील :* मास्तर, मी तुम्हाला फक्त विहीर विकली आहे त्यातील पाणी नाही. तेव्हा तुम्हाला पाणी हवं असेल तर त्याचे वेगळे पैसे मोजावे लागतील.
*शिक्षक :* बरं झालं, आपण आलात आणि विषय काढला. नाहीतर मीच तुमच्याकडे येणार होतो. तर मग आल्यासरशी तुम्ही  तुमचं पाणी घेऊन जा नाहीतर माझ्या विहीरचे भाडे तुम्हाला द्यावे लागेल.
*वकील :* तसं काही नाही मास्तर मी थोडीशी तुमची गंमत करत होतो.
*शिक्षक :* लेका, तुझे जज्ज, मामलेदार, तहसीलदार माझ्याकडून शिकून गेलेत. आणि तु मामुल वकील माझ्यापुढे शहाणपणा दाखवतोयत.

_*....तमाम शिक्षकांना समर्पित*_

लंचबाँक्स

*लंचबाँक्स*

"ये रे उदय जेवायला" सात आठ जणांसोबत जेवायला बसलेल्या श्रीकांतनं त्याला हाक मारली.
" सुरु करा तुम्ही मला भुक नाहीये" उदय उत्तरला खरा पण त्याला सडकून भुक लागली होती.त्यातून उघडून ठेवलेल्या डब्यांतून येणारा भाज्यांचा खुमासदार वास त्याला वेडं करत होता.तिथून तो तडक निघाला आणि आँफिसबाहेर आला.समोर चहाची टपरी सुरु होती.तिथं जाऊन त्यानं एक फुल चहा मारला.वर बिस्कीटं खाल्ली.खवळलेला जीव थोडा शांत झाला.पण आता आत गेलो तर परत जीव कासावीस होणार हे त्याला माहीत होतं म्हणून टपरीवरचं एकमेव व्रुत्तपत्र दोन तीन वेळा वाचून त्यानं टाईमपास केला अ्न दोनच्या सुमारास तो आँफिसमध्ये परतला.

  गेल्या चार वर्षांपासून हे असंच सुरु होतं.लग्नाअगोदरची तीन वर्षं आणि लग्नानंतरच एक वर्ष त्यानं जेवणाच्या डब्याशिवायच घालवली होती.नाही म्हणायला लग्नानंतर महिनाभर आरतीनं त्याला डबा दिला होता.पण तिचे होणारे हाल आणि होणारी धावपळ पाहून त्यानंच तिला डबा करायला नाही सागितलं होतं.आरती स्वतःही नोकरी करत होती आणि तिलाही उदयसारखं लवकरच निघावं लागायचं.तिच्या कंपनीच्या कँटीनमध्ये मिळणाऱ्या सुग्रास जेवणामुळे तिला डब्याची गरज भासायची नाही .मात्र उदयच्या आँफिसमध्ये तशी कसलीच व्यवस्था नसल्याने त्याच्यासाठी डबा करायला तिला पहाटे चार वाजताच उठावं लागायचं.त्यामुळे त्याचा डबा करुन,तिची स्वतःची तयारी करुन कंपनीत जाण्यासाठी तिला अगदी तारेवरची कसरत करावी लागत होती.ते पाहूनच उदयनं तिला डबा करायला मनाई केली खरी पण ते सांगतांना त्याला खुप दुःख झालं होतं.

डब्याच्या बाबतीत उदय अगदी लहानपणापासून असाच कमनशीबी होता.तो तिसरीत असतांना त्याची आई वारली आणि त्याचा डबा कायमचा बंद झाला.व्यापारी असलेल्या त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं.त्याच्या सावत्र आईने त्याचा छळ नाही केला पण त्याला प्रेमही नाही लावलं.उदयची शाळा सकाळी सातची असायची आणि ही बया नऊ वाजता उठायची.त्याला शाळेत सोडणारे गडीमाणसं त्याच्या दप्तरात बिस्कीटाचा पुडा,चिवड्याचं नाहीतर वेफर्सचं पाकिट असं काहीबाही टाकून द्यायचे.मधल्या सुटीत बाकीची मुलं डबे उघडून बसायची तेव्हा उदय असुयेनं त्यांच्याकडे बघायचा.चिवडा,बिस्किटांनी त्याचं मन आणि पोट दोन्ही भरायचं नाही.भाजीपोळी आणली नाही म्हणून टिचरचा मार तो खायचा ते वेगळंच.
दहावी झाल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला दुर काँलेजला पाठवलं.तिथं मेसच्या जळक्या पोळ्या आणि पाणीदार भाज्या खाऊन त्यानं दिवस काढले.चुकूनही त्यानं कशाविषयी त्यानं तक्रार केली नाही.काँलेज झाल्यावर त्याला शहरात चांगली नोकरी लागली पण इथंही डब्याची काहीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे सकाळी एखाद्या हाँटेलवर केलेला नाश्ता आणि संध्याकाळी मेसवर केलेलं बेचव जेवण असंच त्याचं रुटीन राहीलं.

उदय खऱ्या अर्थाने उपाशी होता.प्रेमाने करुन दीलेला दुपारच्या जेवणाचा डबा हे त्याचं स्वप्न होतं.लग्नानंतर तरी हे दिवस पालटतील आणि आँफिसमध्ये बसून बायकोच्या हातचा वरण,भात,भाजी,पोळीचा डबा सुखाने खाता येईल या सर्व आशेने तो लग्नासाठी आतुर झाला होता.लग्न ठरलं पण देखण्या आरतीने आहे त्या कंपनीतली लठ्ठ पगाराची नोकरी मी सोडणार नाही अशी अट टाकली.सर्वांनी ती खुषीने पण उदयनं नाराजीने मान्य केली.

लग्नानंतर एक महीन्यातच डबा बंद झाला.त्याच्या सहकाऱ्यांना याची त्यानं बरीच कारणं दिली तरी त्यांना ती पटली नाही.त्यामुळे आपुलकीची जागा आता औपचारिकतेने घेतली होती.लंच पिरीएड मध्ये सगळे सहकारी डबे उघडून बसले की औपचारीकतेने बोलवायचे.किती दिवस दुसऱ्यांच्या डब्यातलं खाणार म्हणून तोही तितक्याच औपचारिकतेने त्यांना भुक नाही असं सांगायचा.या काळात आधीच अबोल असलेला उदय अजूनच अबोल होत गेला.आपल्या अस्वस्थतेबद्दल घरीही तो चकार शब्द काढायचा नाही.आरतीची असहाय्यता त्यालाही कळत होती.

         एके दिवशी आँफिसला जाण्यासाठी तो उठला.पाहतो तर आरती किचनमध्ये कांदा चिरत होती.
"हे काय?आज काही विशेष?"त्यानं विचारलं
"विशेष काय असणार आहे?तुमच्यासाठी डबा बनवतेय"ती कांदा चिरतांना डोळ्यात आलेलं पाणी पुसत म्हणाली.
"काय?आणि आज तुला कंपनीत नाही जायचं?"त्यानं आश्चर्याने विचारलं.
"मी उशीरा जाणार आहे थोडं,काही सेटलमेंट करायच्या आहेत"
"कसल्या सेटलमेंट?"
"सांगते. संध्याकाळी तुम्ही आँफिसमधून परतल्यावर"
" ओके.आज मजा येईल आँफिसमध्ये"तो आनंदाने म्हणाला.

आँफिसमध्ये आल्याआल्या त्यानं डबा आणल्याची अनाउन्समेंट करुन टाकली.
दुपारी सर्वांसोबत जेवतांना तो खुप खुष होता.
"अरे पण डबा आजच्या दिवसासाठीच आहे की रोजच आणणार आहेस?"कोणीतरी विचारलं तसा तो भानावर आला.
"बघुया"असं म्हणून त्यानं उत्तर द्यायचं टाळलं.त्याला स्वतः ला तरी कुठे माहीत होतं त्याचं उत्तर!

संध्याकाळी तो घरी आला तेव्हा आरती घरीच होती.चहा झाल्यावर त्याच्या समोर बसत म्हणाली.
"उद्यापासून तुम्हाला रोज डबा मिळेल.मी नोकरी सोडलीय"
"काय?असा अचानक निर्णय कसा घेतलास?
" अचानक नाही.आठवतंय १५-२० दिवसांपुर्वी तुमचा बालमित्र घरी आला होता.त्याने मला तुमची बालपणापासूनची कहाणी सांगितली. ती ऐकुन खुप रडले मी.तेव्हाच मी निर्णय घेतला होता.मागच्या आठवड्यातच मी राजीनामा दिला.आज सगळी सेटलमेंट करुन आले"
तो धक्का बसल्यागत तिच्याकडे बघत होता.
" अगं पण एक शब्दाने तर मला विचारायचं होतं"
"तुम्ही नाहीच म्हंटला असता आणि मग मलाही मोह झाला असता.पण काळजी करु नका.मी आता घरबसल्या रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय करणार आहे.तुम्हाला माहीत आहेच की माझं पुर्ण कुटुंब व्यवसायातच आहे त्यामुळे मी नक्कीच यशस्वी होईन."
त्याचा अजून स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता.
"पण निव्वळ माझ्या डब्यासाठी तू इतक्या चांगल्या पगाराची नोकरी....."
"डब्यासाठी नाही तर तुमच्या आनंदासाठी,समाधानासाठी सोडली असं म्हणा.पुढे आपल्याला मुलं होतील.त्यांचीही तुमच्यासारखी डब्याअभावी  झालेली अवस्था मला बघवणार नाही."
"ग्रेट आहेस तू आरती"तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला.
" नाही उदय.मुलं आणि कुटूंबासाठी आपल्या भारतातील असंख्य बायका करीयर आणि पैशावर पाणी सोडतात.ज्या सोडत नाहीत त्या ऐतखाऊ नवरा आणि कजाग सासुचा त्रास सहन करत तारेवरची कसरत करत असतात.त्यामानाने मी खुप नशीबवान आहे.मला सासू नाही आणि नवरा खुप समजदार मिळालाय"
तिच्या मनाचा मोठेपणा पाहून त्याचे डोळे पाणावले.

*©दीपक तांबोळी*
       9503011250
(ही कथा माझ्या "कथा माणुसकीच्या " या पुस्तकातील आहे.क्रुपया नावासहितच शेअर करावी)

शहरात एक👵 आजी 🍊संत्री विकायला बसायची..

एका शहरात एक👵 आजी 🍊संत्री विकायला बसायची.
.
एक दिवस तिच्या जवळ एक 👨तरूण आला साधारण ३० एक वयाचा..
.
त्याने 👵आजीला विचारले, *"आजी 🍊संत्री कशी दिली ग?"*
.
👵आजीने भाव सांगितला.. 
.
त्याने २ किलो 🍊संत्री विकत घेतली आणि त्यातल एक🍊 संत्र सोलुन एक फोड खाऊन तो तरुण आजीला म्हणाला, *"👵आजी हे संत्र गोड आहे का बघा हो जरा?"*
.
👵आजीने ✋हात पुढे करत 🍊संत्र हातात घेऊन एक फोड खाल्ली.
आणी म्हणाली. *"लेकरा गोडच हाय की"*
.
तो हसत हसत आजीच्या हातातील ते संत्र न घेताच निघून गेला.
.
असच दुसरया दिवशीही तो आपल्या 👩पत्नीला बरोबर घेऊन आला.
त्या दिवशी ही त्याने संत्र्याची एक फोड खात 🍊संत्र गोड आहे का विचारत आजीच्या हातात संत्र देऊन हसत हसत घरी गेला.
.
असे बरेच दिवस निघून गेले. 
.
👵आजीच्या शेजारची एक भाजीवाली व त्या तरूणाची पत्नी हे रोज पाहत असे.
.
एक दिवस त्याच्या पत्नीने विचारले, *तु असा रोज वजन झाल्यावर आजीला एक संत्र का देतोस आणि ते ही अर्ध खाऊन?*
.
तो 👨तरुण आपल्या 👩पत्नीला म्हणाला, *अग वेडे 👵आजी रोज ही🍊 संत्री विकते पण ती स्वतः कधीच ही संत्री खात नाही, कारण तिला २ रूपये कमी मिळतील. मी तिला रोज एक संत्र खायला घालून माझ्या आजीच्या रूपात तिला पाहतो.*
.
पत्नीने गर्वाने नवरयाला मिठी मारली.
दुसरया दिवशीही तसच घडल. 
.
तेव्हा शेजारी असलेली भाजीवाली आजीला म्हणाली, *अग हा पोरगा रोज कशापाई तरास देतो ग तुला आजी? समदी संत्री गोड हायीत.*
.
आजी तरूणाकडे व त्याच्या पत्नीकडे पाहुन हसत म्हणाली. *अग त्यो पिरमा पायी असा वागतुय. अन त्याचा हा जिव बघुन म्या बी त्याच्या वजनात चार संत्री रोज ज्यादा घालते."*
.
आजीचे शब्द एकुन त्याला खुप बर वाटल. 
.
मनात विचार करत असताना.
शेजारी बसलेली भाजीवाली आजी त्या तरूणाला म्हणाली, *बाळा तु जे गमावत होता ते खुशीत गमावत होतास. म्हणुन तर तुला न मागता संत्री आणि या आजीच प्रेम या दोन्ही गोष्टी मिळाल्या..*
.
*मित्रांनो ओंजळीत बसेल एवढ नक्की घ्या...*
.
*पण सांडण्या अगोदरच ते वाटायलाही शिका...*
.
*माणूसकी कमी होत चाललीय...*
.
*तेवढी फक्त जपायला शिका...*
.

इतिहासातील एक मनोरंजक घटना*

*वाचण्यासारखे काही....*



*इतिहासातील एक मनोरंजक घटना*

       स्कॉटलंड मध्ये एक अतिशय तुटपुंजी आर्थिक परिस्थिती GC असलेला एक शेतकरी होता. एके दिवशी नेहमी प्रमाणे त्याच्या शेतीच्या कामात व्यस्त होता तेंव्हा त्याला, एका लहान मुलाच्या किंकाळ ऐकू आल्या. जीवाच्या आकांताने ओरडत असलेल्या त्या हाका ऐकुन त्या शेतकऱ्याने हातातली अवजारे/शेतीच काम सोडून आवाजाच्या दिशेने धाव घेतली. सदर जागी जाऊन पाहतो तर एक चिमुरडा, दलदल मध्ये गळ्यापर्यंत रुतलेला दिसला. काही क्षणांचा विलंब आणि त्या मुलास जिवंत समाधी, अशी स्थिती पाहून त्या शेतकऱ्याने स्वतः चा जीव धोक्यात घालून, प्रचंड अरापिता करीत त्याच्या आजूबाजूचा गाळ काढला, आणि त्या जीवघेण्या संकटातून त्या मुलाची सुटका केली.

दुसऱ्या दिवशी लवजम्या सहित एक आलिशान बग्गी त्या शेतकऱ्याच्या घरापाशी येऊन थांबली. त्या बग्गी मधून एक अतिशय धनवान व्यक्ती उतरली आणि त्या शेतकऱ्या च्या घरी गेली. त्या व्यक्तीने शेतकर्यास स्वतःचा परिचय दिला, की काल ज्या मुलाला तुम्ही मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, त्या मुलाचा ती व्यक्ती पिता आहे, म्हणून शेतकऱ्याने केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद देणे करिता ते आले आहेत. त्यांचा वार्तालाप चालू होता, त्या धनाढ्य व्यक्तीला त्या दरम्यान जाणवलं की हा शेतकरी आर्थकदृष्टया तितका सक्षम नाही, तथापि अतिशय स्वाभिमानी आहे, हा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेणार नाही.

त्या शेतकऱ्याचा मुलगा, दरवाज्यातून आत येतो. त्या धनाढ्य व्यक्तीने त्या मुलाबद्दल शेतकऱ्याला चौकशी केली की हा कोणत्या शिकत आहे. शेतकऱ्याने त्यास उत्तर दिले की त्याचा मुलगा हा काही विद्यार्जन करत नसून, शेती कामात मदत करतो. यावर त्या धनाढ्य व्यक्तीने शेतकऱ्यास असे सुचविले की, की माझ्या मुलाला तुम्ही जीवनदान दिलं त्या बदल्यात तुमच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मला घेऊ द्या, जेणेकरून मी तुमच्या मुलास उत्तम भविष्य, देऊ शकेन. यावर त्या शेतकऱ्यानं सहमती दर्शविली.

त्या शेतकऱ्याच्या मुलाला इंग्लंड च्या नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश दिला गेला आणि त्या मुलाचं शिक्षण सुरू झालं. काही दिवसातच कळाल की हा मुलगा सर्वसामान्य नसून विलक्षण बुद्धिमान आहे, त्या मुलाने शिक्षण क्षेत्रात अतिशय कौशल्य दाखविले, आणि तो उच्चशिक्षण देखील घेऊ लागला. पुढे तो मुलगा संशोधन कार्यात उतरला.

ही दोन्ही मुलं त्यांच्या ऐन तारुण्यात असताना, त्या धनाढ्य व्यक्तीचा मुलगा आजारी पडला. आजार वाढतच चालला होता, आर्थिकदृष्ट्या अतिशय बलवान असल्याने त्याच्या पित्याने उपलब्ध असणाऱ्या सर्व वैद्य, औषधोपचार केले, पण तरीही आजार उतरत नव्हता. त्या वेळेला त्या आजारास कोणतेही ठोस आणि खात्रीलायक औषध नव्हते. याच दरम्यान त्या शेतकऱ्याच्या मुलाने, त्याच्या संशोधन कार्यात एक जबरदस्त मजल मारली, आणि एक लस शोधून काढली, आणि नेमकी हीच लस म्हणजे त्या धनिकाच्या मुलाच्या आजारावर रामबाण औषध होती. त्या लसिमुळएच पुन्हा एकदा हा मुलगा मृत्यूच्या तोंडातून परत आला.

बालपणी ज्याने जीवदान दिले, त्याच्याच मुलाने तारुण्यात पुन्हा एकप्रकारे त्याच धानिकाच्या मुलाचा जीव वाचविला होता. हा कुठेतरी प्रामाणिक पणाने, कृतज्ञ पणाने स्वतः च्या मुलाला वाचविले ची परतफेड करणे करिता केलेल्या कार्याची ही एक प्रकारे परतफेड होती.

*आता ही सर्व पात्रे कोण ते सांगतो,*

तो धनिक व्यक्तीचा मुलगा, म्हणजे इंग्लंडचा माजी पंतप्रधान, *विन्स्टन चर्चिल,*

तो शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे, थोर शास्त्रज्ञ *अलेक्झांडर फ्लेमिंग,* आणि त्याने शोधून काढलेली लस म्हणजे, *पेनिसिलीन.*

टीप

*टीप*
टेबल वर ऑर्डर घेऊन आलेला सुखदेव  टेबलावरची माणसे बघून हबकून गेला.
   तब्बल २५ वर्षानंतर तो हे चेहरे पुन्हा बघत होता.कदाचित त्या चौघांनी त्याला ओळखले नव्हते किवा ओळख दाखवत नव्हते.
  चौघापैकी दोघेजण मोबाईल मध्ये व्यस्त होते आणि दुसरे दोघे लॅपटॉप मध्ये.       
    कदाचित आत्ताच झालेल्या डीलची आकडेमोड चालली होती.
     शाळेतील मित्र खुप पुढे निघून गेले होते, आणि स्वतः मात्र कॉलेज पर्यंत सुद्धा पोहचू शकला नव्हता.
    नंतर दोन तीन वेळा त्यांच्या टेबल वर तो गेला, पण सुखदेव ने स्वतःची ओळख लपवून पदार्थ वाढले.
     चारी बिझनेसमन  मित्र जेवण संपवून निघून गेले.
   आता परत कधी इकडे न आले तर बर, असा विचार त्याच्या मनात आला.
  स्वतःच्या निष्फलते मुळे शाळेतील मित्रांना ओळख सुधा दाखवता आली नाही म्हणून सुखदेव ला फार वाईट वाटले.
   सुखदेव, टेबल साफ कर. तीन हजारचे बिल केले पण एक पैसा *टीप* म्हणून ठेवला नाही साल्यानी, मॅनेजर वैतागून बोलला.
   टेबल साफ करता करता सुखदेव ने टेबलावर पडलेला पेपर नॅपकिन उचलला,
 त्या चार बिझनेस मननी पेनानी कदाचित त्या नॅपकिन वर पण आकडेमोड केली होती.
   पेपर टाकता टाकता सहज त्याच्या कडे लक्ष गेले, 
 त्यावर लिहिले होते....
  तुला *टीप* द्यायला आमचा जीव झाला नाही, ह्या होटेलशेजरीच आम्ही एक फॅक्टरी घेतलीय, म्हणजे आता येणे जाणे सुरूच राहील, तू आमच्या बरोबर जेवायला बसला नहीयास, उलट आम्हाला तू वाढतोय हे कस वाटते❓
   आपण  तर शाळेत एकमेकाच्या डब्ब्यातून खाणारे,
  आज तुझा ह्या नोकरीचा शेवटचा दिवस,.    फॅक्ट्रिमध्ये  कॅन्टीन तर कोणालातरी चलवलीच पाहिजे ना❓
   शाळेतील तुझेच मित्र.
  खाली कंपनीचे नाव आणि फोन no.लिहिला होता.
   आत्तापर्यंत मिळालेल्या सर्वात मोठ्या *टीप* ला सुखदेव नी ओठांना लावून  तो कागद खिशात व्यवस्थित ठेवला.
*THIS IS THE QUALITY OF REAL FRIENDS*

व. पु. ची एक भन्नाट कविता ---*

*व. पु. ची  एक भन्नाट कविता ---*

माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं
आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होत,
पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं
घरादाराला कधीही ’लॉक'  नव्हतं..
*तरीही माझ जीवन सुखाचं होतं* ||१||

आजोबांच स्थान घरात सर्वोच्च होतं
स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होत,
पाहुण्यांचे येणे-जाणे नित्याचेच होतं
आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हतं..
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* ||२||

घरासमोर छोटंसं अंगण होतं
तुळस, प्राजक्ताला तिथे फुलता येत होतं,
दारात रांगोळी काढणे अनिर्वाय होतं
विहिरीवरून पाणी भरण कष्टाचं होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ३ ||

आंघोळीला लाईफ़बॉय साबण असायचा, 
माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा,
दात घासायला कडुलिंबाचा फ़ाटा लागायचा- 
दगडाने अंग घासणं फ़ारसं सुसह्य नव्हतं
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ४ ॥

पायात चप्पल असणं सक्तीच नव्हतं
अंडरपॅट बनियनवर फ़िरणं जगन्मान्य होतं
शाळेसाठी मैलभर चालण्याचं अप्रूप नव्हतं
मोठ्यांना सायकलशिवाय दुसरं वाहन नव्हतं..
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ५ ॥

शाळेत गुरुजनांप्रती आदर होता
घोकंपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता,
पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता
छडी हे शिक्षकाचं लाडकं शस्त्र होतं..
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ६ ॥

शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता,
नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता,
अंगणात येवून शिकणाराही एक वर्ग होता
कलांना "भिकेचे डोहाळे" असंच नाव होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ७ ॥

नव्या कपड्यांचा लाभ लग्न-मुंजीतच व्हायचा
पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा, 
शाळेचा युनिफोर्म थोरल्याकडूनच मिळायचा
तिन्हीसांजेला घरी परतणं सक्तीच होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ८ || 

वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायाच्या
पोपटांचा थवा झाडावर विसावायचा,
कुत्रा, मांजर, डुकरानी गाव भरलेला असायचा - 
उंदीर, डास, ढेकुण यांचे सार्वभौम्य राज्य होतं..
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ९ ||

पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे
घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे,
उरलेले प्राणी नंतर पेशवेपार्कात भेटायचे - 
नॉनवेज खाणं हे तर माहितीच नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १० ||

शाळेत अभ्यासाला खूप महत्व होतं
नंबरावर बक्षीस/छड्या यांचं प्रमाण ठरत असतं,
कॉपी, गाईड, क्लासेसना स्थानही नव्हतं
वशिल्याने पास होणं माहितीच नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ११ ||

गावची जत्रा  हीच एक करमणूक असायची - 
चक्र-पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची, 
बुढ्ढीके बाल, गाठीशेवेची तोंडलावणी व्हायची
विमानातला फोटो काढणं चमत्कारिक होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १२ ||

गावाबाहेरच जग हिरवागार असायचं
सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छच असायचं, 
पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं,
प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहितीच नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १३ ||

हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा
क्रिकेटच्या मॅचेस चाळीत व्हायच्या,
बापू नाडकर्णी, चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या
डे-नाईट, ट्वेंटी- २० चं नावही नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १४ ||

प्रवास झालाच तर एस्टीनेच व्हायचा
गचके, ठेचकाळणे याला अंत नसायचा,
हॅन्डल सोबत फिरकीचा तांब्याही लागायचा
लक्झरी, फर्स्टक्लास एसीचं नावही नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १५ ||

दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळी होती
चमनचिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात्र होती,
रंगीत तेल, उटणे, मोती साबणाची ऐश होती
लाडू, चकल्या, करंज्या यांचे दर्शन वार्षिकच होतं..
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १६ ||

जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायाची
बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची,
रेडीओ सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची
ताई, नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १७ ||

खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा
दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा,
पानात टाकणाऱ्याच्या पाठीत रट्टा बसायचा
हॉटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १८ ||

मामाच्या गावाला कधी जाणं-येण होतं
धिंगामस्ती करायला नैशनल परमिट होतं,
विहिरीत पोहायला तिथेच मिळत होतं
भाऊबिजेला आईच्या ताटात फारस पडत नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १९ ||

घरातले पुरुष कर्तेसवरते असायचे
बायांना दुपारी झोपणे माहिती नसायचे,
पोराबाळाना गोडधोड सणावारीच मिळायचं
प्रायव्हसीला तिथे काडीचंही स्थान नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || २० ||

पाव्हणे रावळे इ.चा घरात राबता असायचा
सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा,
गाववाल्यानाही पंक्तीत सन्मान असायचा
पंक्तीत श्लोक म्हणणं मात्र सक्तीचं होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || २१ ||  

आज घराऐवजी लक्झुरीयस फ्लॅट आहे
मोपेड, स्कूटर, मोटारचा सूळसुळाट आहे, 
टीव्हीवर शंभर वाहिन्यांचा दणदणाट आहे
फास्टफूड, पार्ट्या, ड्रिंक्स याना सन्मान आहे,
*कौटुंबिकसुसंवादाची मात्र वानवा आहे* || २२ ||

आज मुलांसाठी महागडी शाळा-कॉलेजेस आहेत
दूध, बूस्ट, काॅम्प्लानचा भरपूर मारा आहे,
क्लास, गाईड, कॅल्क्यूलेटरची ऐशच ऐश आहे
कपडे, युनिफोर्म क्रीडासाहित्य हवे तितके आहे,
*बालकांच्या नशिबी मात्र  पाळणाघर आहे* || २३ ||

आज पतीला ऑफिसात मरेस्तोवर काम आहे
सुशिक्षित पत्नीला करियरचा हव्यास आहे,
एक्स्ट्रा ऐक्टीविटीजना घरात सन्मान आहे
छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहे,
*आजीआजोबाना वृद्ध आश्रमाचा रस्ता मोकळा आहे*||२४||

आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे
मागेल ती वस्तू क्षणात हजार होते आहे,
इन्स्टालमेंट, क्रेडीट कार्डचा सूळसुळाट आहे
सध्या बाय वन गेट वनचा जमाना आहे..
म्हणून
*पैशांवर  समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे..*||२५||

*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹*

नियती नावाची मावशी

नियती नावाची मावशी  
उजव्या कुशीवरून डाव्या 
कुशीवर एकदाच वळली 
फक्त...

माझ्या  एक एक तासाची 
किंमत आहे असं उर्मट 
चेहऱ्याने सांगणारे,

पुढच्या महिन्यात फोन करून 
पाहा. हा महिना तर अगदी 
ओव्हर पॅक आहे म्हणणारे,

पुढच्या दोन महिन्यात सहा 
देशांत फिरणार आहे असं 
मिरवणारे,

तुला बघुन घेतो मी, तुझ्या 
गावात येऊन घरात घुसतो 
असा दम भरणारे,

मी फोन उचलत नाही हो. 
सतत मिटिंग असतात 
ऑफिस मध्ये आमच्या 
असा दावा करणारे,

माझ्या एका हाकेवर दहा 
हजार लोक जमा होतील 
असं गरजणारे,

दर काही दिवसांनी 
ऑफिस ची टूर आहे 
सांगून बाहेरख्याली 
करून फसवणारे,

सगळे थांबले..
शांत..
एका रांगेत..
तोंड झाकून..
अंतर राखून..

नियती नावाची मावशी  
उजव्या कुशीवरून डाव्या 
कुशीवर एकदाच वळली फक्त..

*-सलील कुलकर्णी.*

एक सुंदर अनुभव. *"मनातल्या घरात"*

🔆 एक सुंदर अनुभव. *"मनातल्या घरात"*
           ( *Self - Introspection* )

आपण मनातल्या घराला कधी भेट दिली आहे कां ???  

एका ठिकाणी बसून करमत नाही. मग उगाच आपण, इथे तिथे फिरायला जातोच की !!! मग ती  पर्यटन स्थळ असतील किंवा कोणाच्या तरी घरी !!! याच्या त्याच्या घरी, या ना त्या कारणाने आपण पाहुणा म्हणून जातोच. मग मी ठरवले, कां नाही आपण आपल्याच मनाच्या घराचा पाहुणचार घेऊन यावा ???

हो, हो, चक्क स्वतःच्याच मनाच्या घरचा पाहुणचार !!! आपणच आपल्या मनाच्या  घराला भेट द्यावी म्हंटले, बघावे तरी काय आणि कसं ठेवलंय हे मनाचे घर !!! कोण, कोण रहातात तिथे ???  कसे स्वागत होत ते ???

ठरल्याप्रमाणे मनाच्या घराच्या दारापर्यंत पोहचलो. अगदी छोटेसे होते, पण छान होते !!! आत काय असेल, या उत्सुकतेने दार वाजवले, तर आतून आवाज आला, "कोण आहे ???? काय पाहिजे ????" असा प्रश्न आतून विचारला जाईल याची कल्पना नव्हती पण खरंच आपण कोण आहोत, हे त्याला सांगितल्या शिवाय तो आपल्याला आत तरी कसा घेणार ???

मी ही सांगितले, "मी *स्व* आहे रे !!! ज्याचे तू कध्धी ऐकत नाही. ज्याच्याशी तू सतत वाद घालत असतोस, ज्याच्याशी तू दिवस रात्र गप्पा मारत असतो तो मी !!!"

आतून आवाज आला, " बरं.... बरं...उघडतो दार !!!" दार उघडल्या नंतर आत पाहिले, तर गडद अंधार होता. म्हणून मी विचारले, " कां रे एवढा अंधार ???" तेव्हा तो म्हणाला, " तुमच्याच कृपेने !!! मी म्हंटले, " माझ्या कृपेने ??? तर तो म्हणाला, "हो !!! तुझ्याच कृपेने !!! कारण इथे उजेड तेव्हा पडेल, जेव्हा तू सकारात्मक विचारांचे दिवे लावशील."

मी ही जरा ऐटीतच म्हणालो, "ठीक आहे... ठीक आहे !!! लावतो दिवे" म्हणत, पुढे सरकलो. थोडं पुढे चाचपडत गेलो तर काय !!! तिथं असंख्य खोल्या होत्या. अगदी कोंदट वातावरण होते. मी त्याला पुन्हा विचारले, "काय रे, त्या खोल्यात काय दडलंय ???"

तो पुन्हा म्हणाला, " बघ की उघडून एक एक खोली, कळेल काय आहे ते." मग मी हळूच एका खोलीचे दार उघडले.  आणि...फडफड करत अनेक रागीट चेहरे समोर आले. जणू काही ते मला गिळंकृतच करणार आहेत. मी पटकन दार लावले. तेव्हा तो म्हणाला, " काय झालं ??? दार कां लावले ???" मी म्हंटले, " कसले भयानक होते रे ते !!! " तर तो पुन्हा हसत म्हणाला, " तुम्हीच गोळा केले आहेत ते !!! तुम्ही ज्यांचा ज्यांचा तिरस्कार करता, ज्यांचा राग करता, त्यांची संख्या किती आहे ते कळलं कां ??? तुम्हीच केलेली मेगा भरती आहे ती !!!"

हुश्श.....अरे बापरे !!! पुढचं दार उघडायचे धाडसच होईना, पण म्हंटले आता आलोच आहे तर उघडावे. तिथे ज्या काही घटना पहिल्या त्याने तर घामच फुटला. तो पुन्हा मिस्कीलपणे म्हणाला, " काय, काय झालं... ??? मी म्हंटले, "अरे बाबा, हे काय ??? तो पुन्हा म्हणाला, " तू तुझ्या आयुष्यात सतत दुःखद आठवणीच गोळा करीत गेलास, त्याला मी तरी काय करणार ??? आता तर साठवून ठेवायला या खोल्यासुद्धा अपुऱ्या पडत आहेत."

तिथं अशा किती तरी खोल्या होत्या, ज्यांना उघडायच धाडस माझं झालं नाही. मग त्याने त्या उघडून दाखवल्या, ही भीतीची खोली, ही द्वेष, ईर्षा, वाईट विचारांची, मतभेदांची, गैरसमजांची खोली अशा अनेक खोल्या पाहिल्या, सर्वच्या सर्व अंगावर येत होते.

आता मात्र माझं डोकं गरगरायला लागले, अस्वस्थता वाढली होती. किती भयावह होत ते सर्व !!! त्यामुळे पुढं काय आहे, हे बघण्याची इच्छाच होत नव्हती. हे सारं भयाण बघून अंगाला काटा आला होता. स्वतःचाच तिरस्कार वाटत होता.

मी त्याला म्हंटले, "मी जातो आता. मला काही बघायचं नाही आता." तो म्हणाला, " थोडं...थांब, आलाच आहेस तर हे पण बघून जा."

थोडी हिंमत दाखवत आम्ही पुढच्या दिशेने निघालो....तिथं संपूर्ण जाळ लागलेला होता...मग थोडं पुढे गेलो आणि पाहिलं तर काय....आहा.....हा हा...स्वर्ग सुख मिळावं असं वातावरण होत, तिथं प्रेम होतं, तिथं माया होती, तिथं आनंद होता, उत्साह होता, नवीन नवीन कल्पनांचा बाजार होता. सुख, समाधान शांती ने भरलेले, अगदी नयन दिपून टाकेल असं सर्व काही होते.

मी म्हंटले, "काय रे हे इतकं सुंदर आहे, हे तू मला आधी कां नाही दाखवलं ???" तर तो मिस्कील पणे हसत म्हणाला, " अहो, तुमचं मनातलं खरं घर तर हेच आहे." मग मी म्हणालो, " जे आधी पाहिलं, ते काय होतं ???" तो पुन्हा हसत म्हणाला, " त्या...त्या...तुम्ही अतिक्रमण करत वाढविलेल्या खोल्या आहेत. तुम्ही केलेला राग, इर्षा, द्वेष, भीती, नावडती माणसं, नावडत्या आठवणी याची जी साठवणूक केली, ती या सुंदर घराच्या प्रवेशद्वारा पुढे पहारेकरी बनून बसले आहेत, जे तुम्हाला इथं पर्यंत येण्यास अडवत आहेत."

क्षणभर विचार केला, खरंच की आपणच आपल्या सुख, आनंदाच्या कडे जाणारा रस्ता, या नकारात्मक गोष्टींची साठवणूक करून अडवलेला आहे. मनाच्या घराचा पसारा आवरायला वेळ लागणार होता पण ठरवलं की, आता या अडथळा बनून बसलेल्या खोल्यांची साफसफाई करायची. तिथं सकारात्मक विचारांचे दिवे लावायचे आणि सुख समाधान, शांती कडे जाणारा मार्ग सोपा करायचा.

बरं झालं. आज मनाच्या घरात फिरून आलो, नाहीतर आपल्या मनावर नकारात्मक विचारांचे अतिक्रमण झालेले आहे हे कळलंच नसतं.

मनाच्या घरचा पाहुणचार खूप काही शिकवून गेला. आपल्या मनाचं घर, दुसऱ्याच्या हातात द्यायचं नाही. स्वतःच्या घराची साफसफाई स्वतःच करायची.

*मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो.. तुम्ही तुमच्या मनाच्या घराला कधी भेट देत आहात ???* 
आपण सुरुवात छान केलेली आहे..
BE POSITIVE.. BE HAPPY 
*सकारात्मक रहा.. आनंदी रहा..*

स्त्रियांना नेमके काय हवे असते?*

*स्त्रियांना नेमके काय हवे असते?* 
किंग आर्थर नावाचा एक राजा होता. एका बेसावध क्षणी त्याच्या शेजारच्या राज्यातील राजाने त्याच्यावर हल्ला केला व त्यास कैद करून तुरुंगात बंदिस्त केले. पण तरुण आर्थरच्या विचारांनी त्याचे मतपरिवर्तन झाले आणि त्याने आर्थरला जीवदान द्यायचे ठरवले.

पण त्यासाठी त्याने आर्थर समोर एक आव्हानात्मक अट ठेवली की तो आर्थरला एक प्रश्न विचारेल आणि त्याचे उत्तर देण्यासाठी वर्षभरासाठी मुक्त करेल. त्या वर्षभरात आर्थर त्याचे उत्तर देऊ शकला तर आर्थरला कायमचे अभय नाही तर मृत्युदंड.

तर तो प्रश्न होता की.....
" स्त्रियांना नेमके काय पाहिजे ? ”

या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता भल्या भल्यांनी हात टेकले होते, तर तरुण आर्थरकडून हे उत्तर शोधले जाणे म्हणजे चमत्कारच ठरला असता. पण जीव वाचवायचा असेल तर उत्तर शोधलंच पाहिजे म्हणून तो स्वतःच्या राज्यात परतला.

तिथे त्याने अनेकांकडे विचारणा केली. त्यात त्याची राणी, नावाजलेले विद्वान, दरबारातले गणमान्य व्यक्ती एवढेच काय तर राजविदुषकाचे ही मत घेतले. पण कुणीही या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.

मग काही जणांनी सुचवले की राज्याच्या बाहेरच्या जंगलात जी म्हातारी चेटकीण राहते तिला जाऊन भेट, तिच्याशी सल्लामसलत कर. ती नक्कीच समर्पक उत्तर देऊ शकेल. पण तिचा सल्ला घेणे तुला चांगलेच महागात पडू शकते कारण ती चेटकीण केलेल्या उपकारांची अवाजवी किंमत वसूल करण्यासाठी कुप्रसिद्ध होती.

हाताशी असलेला वेळ वेगाने संपत होता म्हणून अखेर आर्थरने तिच्याकडे जायचे ठरवले.

चेटकिणीने आर्थरचा प्रश्न नीट ऐकून घेतला व धूर्तपणे उत्तरली, "मी या प्रश्नाचे उत्तर अवश्य देईन पण त्याबदल्यात तुला माझी एक इच्छा पूर्णा करावी लागेल; तुझा मित्र लॅन्सलॉटला माझ्याबरोबर लग्न करावे लागेल."

सर लॅनस्लॉट आर्थरचा जवळचा मित्र होता व त्याची ओळख एक कुलीन व्यक्तिमत्त्व व शूर
योद्धा अशी होती.

तिची हि मागणी ऐकून आर्थर सर्वार्थाने हादरला. ती चेटकीण जख्खड म्हातारी व दिसायला अत्यंत कुरूप होती. तिच्या मुखात केवळ एकच सुळा होता. तिच्या कंठातून चित्रविचित्र आवाज येत राहायचे व ति जिथे जाईल तिथे दुर्गंध पसरायचा.

आर्थरने तिची मागणी धुडकावून लावली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या मित्राला जिवंतपणी नरकयातना भोगायला लावायचे पाप त्याला माथी घ्यायचे नव्हते.

पण लॅन्सलॉटला जेव्हा हे कळले त्याने तडक चेटकिणीची मागणी पूर्ण करण्याचा हट्ट आर्थरकडे धरला. तो म्हणाला माझ्या मित्राच्या प्राणांपुढे हा त्याग काहीच नाही. नाईलाजाने का होईना आर्थरने लॅन्सलॉटचे म्हणणे मान्य केले. लॅनस्लॉट व चेटकीण यांच्या विवाहाची घोषणा झाली.

तेव्हा चेटकिणीने आर्थरचा जीव वाचवणारे उत्तर दिले की....

" स्त्रीला तिच्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार हवा असतो "

हे उत्तर ऐकून सर्वांना जाणीव झाली की चेटकिणीने एक महान सत्य उघड केले आहे.

शेजारच्या राज्याच्या राजालाही हे उत्तर पटले व त्याने आर्थरला सर्व बंधनांतून मुक्त केले. या घटनेच्या आनंदोत्सवाबरोबरच चेटकीण व लॅन्सलॉट यांचा विवाह धूमधडाक्याने पार पडला.

विवाहाच्या पहिल्या रात्री जड पावलांनी घाबरत घाबरतच लॅन्सलॉटने शयनकक्षात प्रवेश केला. पण समोरचे दृश्य बघून त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मंचकावर चेटकिणीऐवजी एक अतिसुंदर रूपगर्विता तरुणी बसली होती.

धक्क्यातून सावरल्यावर त्याने त्या तरुणीला विचारले की हा बदल कसा काय झाला ?

त्यावर ती म्हणाली की, मी चेटकीण असतानाही तू माझ्याशी एवढा प्रेमाने वागलास म्हणून मी ठरविले आहे की दिवसातला अर्धाच काळ मी चेटकीणीच्या रूपात राहीन आणि उरलेला अर्धा काळ या सुंदर व तरुण रूपात.

आता मी कोणत्या वेळी चेटकिणीच्या रूपात
राहायचे अन कोणत्या वेळी या रूपात राहायचे हे तुला ठरवायचे आहे.

यावर लॅनस्लॉटच्या मनात दोन विरुद्ध पर्यायांमुळे विचारांचे द्वंद्व सुरू झाले. दिवसा तरुणी होऊ दिले तर सर्वांसमोर रुपवान पत्नी म्हणून मिरवता येईल. पण रात्री एकांतात काय ?

अन त्याउलट पर्याय निवडला तर कसे होईल ?

आता कल्पना करा की लॅन्सलॉटच्या जागी तुम्ही आहात अन एका पर्यायाची निवड करायची आहे तर अशा वेळी तुम्ही कोणता पर्याय निवडला असता ?

तुमचा पर्याय ठरला असेल तर खाली लॅन्सलॉटचे उत्तर वाचा.


कुलीन लॅन्सलॉट चेटकिणीला म्हणाला की, आजपासून जरी तू माझी पत्नी असली तरी केव्हा कसे राहायचे हे ठरविण्याचा हक्क पूर्णपणे तुझाच आहे. तुला जेव्हा जसे आवडेल तेव्हा तू तशी राहा. माझी कसलीही हरकत राहणार नाही.
हे ऐकून चेटकीण लॅन्सलॉटवर प्रचंड खूष झाली व तिने त्याला वचन दिले की ती चेटकिणीच्या रूपाचा कायमचा त्याग करेन. कारण लॅनस्लॉटने तिला आदराने वागवले व तिच्या आयुष्याचे निर्णय घ्यायचा पूर्ण हक्क तिला दिला.
तात्पर्य :
" बायकोला मनाप्रमाणे वागू द्या, जीवन सुदर होईल 
नाहीतर गाठ चेटकीणीशी आहे. "
Lock down अजून दोन आठवडे वाढलाय.😀😀😀😀😀😀😀👍           😜पूर्ण---सत्य😜🌹

आयुष्य रिवाइंड झाले*

*आयुष्य रिवाइंड झाले*
निसर्गाने किमया केली
माणसे ३० वर्षे मागे गेली..
रियालिटी शोज झाले बंद
महाभारत रामायण सुरू झाले...
आठवून आपले पुन्हा छंद
कुटुंब सारे एकत्र आले...
मॅक डी, पिझ्झा, डाॅमिनोज
गेले सगळे बर्गर उडत...
पॏष्टीक पदार्थ बनतात घरी
चायनिज ने नाही अडत....
हळदीच्या दुधाने घेतली
कोल्ड्रींकची जागा हेरून...
सर्व मिळून स्वयंपाक बनतो
सबवे पण येत नाही बाहेरून.
गप्पा करताहेत सर्वजण
कॅरम सापशिडी खेळताना..
मोबाईलही नको वाटतो
परत नाळ जुळताना...
सांध्य-सकाळी जेवणं
एकत्र होऊ लागलीत...
मोलकरणी ला सुट्टी देऊन
साफसफाई करू लागलीत...
आळशीपणाच्या कळसाने
हातपाय धुणे झालेहोते बंद..
विदेशी शेकहऀडचा आम्हाला
फार लागला होता छंद..
प्रदुषण थोडे झाले कमी
धकाधकीला ब्रेक लागले...
पाळणाघरातल्या चिमण्यांना
आई-बाबा मिळू लागले...
शहरांकडे धावणा-यांना
ओढ लागली गावाची...
विज्ञानाच्या युगातही 
आळवणी होत आहे देवाची..
शेकहऀड करणारे हात आता
नमस्कार करायला लागले...
निसर्गाने केली किमया अन्
*आयुष्य रिवाइंड झाले*
     ************
       
💐💐💐💐💐💐💐

रोज मागत होता ना देवाकडे

रोज मागत होता ना देवाकडे 
कंटाळा आलाय जगण्याचा, ह्या धावपळीचा
मग, ऐकली आहे ना त्याने प्रार्थना
थांबवलं आहे त्याने सगळं जग 
तुम्हाला आराम मिळावा म्हणून
तुमची धावपळ कमी व्हावी म्हणून

म्हणत होता ना पिल्लाशी खेळायला वेळ मिळत नाही
त्याचे बोबडे बोल ऐकू येत नाहीत
आता खेळा ना मनसोक्त, ऎका त्याचे बोबडे बोल
तृप्त होई पर्यंत
नको वाटत होता ना रोजचा लटकून केलेला प्रवास
आता लोळा की मस्त घरात, कधी बेडवर कधी सोफ्यावर

म्हणत होता ना गार टिफिन खावा लागतो रोज
आता केली ना त्याने सोय रोज घरच गरमागरम जेवण मिळण्याची
 दिली आहे त्याने सुट्टी साऱ्या जगाला तुम्हाला आराम मिळावा म्हणून
कारण तुम्हीच रडत होता रोज का देवा जन्माला घातल म्हणून
ऐकतो तो प्रार्थना प्रत्यय आता आलाच असेल
तर चला करू परत सगळे प्रार्थना हे सगळं सुरळीत होण्याची, 
ऐकेल जरूर तो हाक त्याच्या पिल्लांची
नक्की काळजी आहे  त्याला आपल्या सगळ्यांची
एवढंच म्हणे देव आहे....👍💐

क्या हम अपनी चारित्रिक श्रेष्ठता प्रमाणित करने के लिए तैयार हैं?

क्या हम अपनी चारित्रिक श्रेष्ठता प्रमाणित करने के लिए तैयार हैं?

द्वितीय विश्वयुद्ध का समय था।
जर्मनी के बमवर्षकों का खौफ था।
लन्दन में दूध की लंबी लाईन लगी थी।
वितरण कर रहे व्यक्ति ने घोषणा की केवल एक बोतल और है, बाकी के लोग कल आयें।
आखिरी दूध की बोतल जिस शख्स के हाथ आनेवाली थी उसके ठीक पीछे एक महिला खड़ी थी जिसकी गोद में छोटा बच्चा था। 
उसके चेहरे पर अचानक चिंता की लकीरें उभर आईं, लेकिन अचानक उसने देखा वितरण करने वाला व्यक्ति उसके हाथ में बोतल थमा रहा था, वह चौंकी। 
उसके आगे खड़ा व्यक्ति बिना दूध लिए लाईन से हट गया था ताकि छोटे बच्चे को गोद में लिए वह महिला दूध हासिल कर सके।
अचानक तालियों की आवाज आने लगी।
लाईन में खड़े सभी व्यक्ति उस शख्स का करतलध्वनि से अभिनन्दन कर रहे थे।
लेकिन उस शख्स ने उस महिला के पास जाकर कहा आपका बच्चा बहुत ही प्यारा है। 
वह इंग्लैंड का भविष्य है उसकी अच्छी परवरिश करिए।
इस घटना की खबर प्रधानमंत्री विंस्टन चर्चिल के पास जब पहुंची तो वे जर्मनी के जबरदस्त हमलों की विभीषिका से उत्पन्न चिंता से उबरकर बोल पड़े, हिटलर को संदेश भेज दो, ब्रिटेन की जीत को कोई नहीं रोक सकता क्योंकि यहां के लोग देश पर मंडरा रहे संकट के समय अपना निजी हित भूलकर देश के बारे में सोचते हैं।
चर्चिल का विश्वास सच निकला। 
ब्रिटेन विश्वयुद्ध में विजेता बनकर उभरा।

हमारे देश पर भी संकट मंडरा रहा है।
क्या हम अपनी चारित्रिक श्रेष्ठता प्रमाणित करने के लिए तैयार हैं?

काहीतरीच तुमचं

काहीतरीच तुमचं
तुमचा प्रश्नच आहे वेंधळा
आपल्याच घरात आपल्याला
येईल कसा कंटाळा.

माझ्या घरातली धूळ सुध्दा 
माझ्यावरती प्रेम करते
किती झटकली तरिही
पुन्हा पुन्हा येऊन बसते.

ताट वाटी भांडं
ही सारीच माझी भावंड 
जेवताना रोज सोबत करतात
पिठलं असो की श्रीखंड

फ्रीज, मिक्सर, गिझर, टिव्ही
सार्या नव्हेत नुसत्याच वस्तू
रिमोट हातात घेतला की
लगेच म्हणतात ' तथास्तु '

कपाट नुसतं उघडलं की
उघडतात मनाचेही कप्पे
वरून खाली दिसत जातात
आयुष्याचे सर्व टप्पे

पलंगावर आडवं पडून
 खोचून घेतली मच्छरदाणी
तरी लपून बसलेला एक डास
कानामध्ये गुणगुणतो गाणी

खिडकी, गँलरी, पँसेज, बाल्कनी
घर असतंच नंदनवन
कितव्याही मजल्यावर घर असो
घरातंच तयार होतं अंगण

आई, बाबा, बायको, मुलं
घरात नेहमीच असते जाग
टेबलावरची एक कुंडी
फुलवते आयुष्याची बाग

घरात नुसतं बसुन रहा
वाढंत जाईल जिव्हाळा
आपल्याच घरात आपल्याला
येईलंच कसा कंटाळा.

पु.ल.देशपांडे ५० विनोदी किस्से*

*पु.ल.देशपांडे ५० विनोदी किस्से*

१) त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले, 'बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो"

२)  माहेरचा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यांचे लग्न ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच घाव घातला' . 

३) वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले, तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली, "हा मझा मित्र शरद तळवलकर"  "हो का? अरे व्वा!" पु.ल म्हणाले होते, "चांगला मनुष्य दिसतो! नव्हे, हा चांगलाच असरणार!" "हे कशावरून म्हणतोस तू?" वसंतरावांनी पु.लं. ना विचारलं. "अरे, याच्या नावावरून कळतेय ते!" पु.ल. म्हणाले. याच्या नावात एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही. म्हणजे, हा माणूस सरळ असणारच!" 

४) पु.लं.च्या "उरलंसुरलं" ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद 
" मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणार्‍याचा आवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे भडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, ' प्लीज जरा मोठ्याने बोलता का? ' असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाज खाली येतो की नाही बघ." 

५) पुलंच्या लहानपणचा एक प्रसंग त्यांची चुणुक दाखवणारा आहे. ते पंधरा वर्षाचे असताना लोकमान्य सेवा सघांत साहीत्य सम्राट न.चीं केळकराचं व्याख्यान होत. व्याख्यानानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची मुभा होती. 

त्या काळी भारतांन फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारु नये, यावर चर्चा चालु होती. शाळकरी पुरषोत्तम उभा राहीला आणी त्यानं तात्यासाहेबांन फेडरेशन स्वीकारावं, की स्वीकारू नये, असा प्रश्न धीटपणे विचारला. त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं. "स्वीकारू नये, पण राबवावं" यावर पुरुषोत्तम म्हणाला, "मला आपलं उत्तर कळलं नाही." तेव्हा समजावणीच्या सुरात ते म्हणाले, "बाळ, आपल्याला कळेल, असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा." ह्यावर पुरुषोत्तम लगेच म्हणाला, "पुण्याला सध्या अंजीरांचा भाव काय आहे" तात्यासाहेबांच काही उत्तर येण्यापुर्वीच सभागह श्रोत्यांच्या हसण्यानं भरुन गेलं. 

६) एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली. बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. "तुमच्या घरी काय, तुम्ही आणी सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार". ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले. "तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?" 

७) पुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या जातात. 'आनदंवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात विविध क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती. समोरच्या पंगतीत 'किर्लोस्कर' मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले होते. मधुनच ते उठले व तो सुखसोहळा आपल्या केमे-यात बंद करण्याच्या कामात लागले. परत येऊन पाहतात, तर ह्यांच पान गेलेलं ह्यांची शोधक नजर पु.ल. लगेच उद,गारले, "मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये." 

८) मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं. यांनी सरकारी कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले,"रेडिओवरच्या मराठीतीन 'अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल' असं मी जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मल्ल कळेना! आता कळलं. 'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं असतं? म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती 'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही!" 

९) माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका. एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखात ऎकत होते. हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना, त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, "तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती?" लग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत होत्या. ते पाहुन पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फुर्त्पणे मोठ्यानं म्हणाले, "अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या 'वर्मा'वर नको रे बोट ठेवुस!" 

१०) कोल्हापूर आणी तेथील एकूणच भाषा व्यवहार म्हणजे पु. ल. च्या मर्मबंधातील ठेव. कोल्हापूरी समाजाइतकाच कोल्हापूरी भाषेचा बाज सागंताना ते म्हणाले, 'इथे रंकाळ्याला रक्काळा म्हणतात पण नगर्याच्या नंगारा करतात. कोल्हापूरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरी बाहेर येऊन आपल्या छातीवर हात बडवायला लावील असं आहे. त्यानं शेतात ऊसं लावला' याच इग्रंजी रूपांतर इथल्या मुन्सफानं एकदा ' He applied U'S In his farm असं केलं होतं आणि त्यावेळच्या शुध्दलेखनच्या नियमाप्रमाणं 'यू' वरती अनुस्वार द्यायलाही तो विसरला नव्हता. 

११) एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पाताळाऎवजी पु.ल. चे 'हसवणूक' हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, 'प्रिय __हिस, तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पाताळाऎवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द हेतु फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच__!' त्यावर ही त्याची पत्नी चिडली. तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रिकेखाली स्वाक्षरीनिशी त्याला समजावले, 'आपल्याकडे नवर्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर!" 

१२) नवीन शुध्दलेखनाचे नियम जर उच्चारानुसार केले तर त्यानुसार होणारे शुध्दलेखन अधिक सुलभ व बिनचूक होईल, असं महामंडाळात घाटत होतं. त्यावर पु.ल. नी खालील छेद दिला, 'मी नुकताच एका ग्रामीण शाळेत गेलो होतो. तिथं मास्तर मुलांना शुध्दलेखन घालीत होते. ते म्हणाले, 'पोरांनो लिवा,कयाssssळs!' 

१३) हिंदुह्र्द्ययसम्राट बाळासाहेब ठाकरे यानां काही कारणास्तव हिंदुजा होस्पिटल मध्दे दाखल करण्यारत आले होते. ते ऎकताच पु.ल. उध्दारले, 'त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता 'गर्वसे कहो हम हिदंजा मे हे' असं लिहालया हरकत नाही.' 

१४) साहीत्य सघांत कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता. पु.ल. ना आर्वजुन बोलावले होते. नाटकाचा पहिला अकं चालू असता- नांच पडल्याचा आवाज झाला. शेजारचा घाबरुन पु.ल. ना म्हणाला, ' काय पडलं हो?' 'नाटक दुसरं काय?' पु.ल. उत्तरले. 

१५) कोल्हापुरला एकदा आमच्या नाटकाचा प्रयोग असतांना नाटकात काम करणारी एक मेत्रीण नुकतीच बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सागंत होती, काय सुदंर सुदंर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात., अप्रतीम नमुने आणि सूदंर कलाकुसर, अनं भरगच्च तर इतके की एक साज घातला गळ्यात की दुसंर काहीच घालायला नको.' हे ऎकत जवळपास असलेले भाई मीश्कीलपणे हळुच म्हणाले, 'खरं सागंतेस की काय?' क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर ऎत्रिणीचीं लाजुन व आमची हसुन मुरकुंडी वळली. 

१६) वॆद्यकातली एकच गोष्ट या क्रीकेटमध्ये येऊन चपखल बसली आहे. ती म्हणजे त्रिफळा. खेळणारांचे येथे चुर्ण व्हावे. गोट साफ.' - इती पु.ल. 

१७) एकदा वसतंराव देशपांडे पु.लं. ना म्हणाले "हि मुलगी (सुनिताबाई) म्हणजे एक रत्न आहे'. ह्यावर पु.लं. लगेच म्हणाले 'म्हणुनच गळ्यात बांधुन घेतलय!! 

१८) एकदा आपली आणी सुनिताबाईंची ओळख करुन देताना पु.लं. म्हणाले की "मी 'देशपांडे' आणी ह्या 'उपदेशपांडे" 

१९) एकदा एक भोजन समारंभात पु.लं. च्या एक बाजुला श्रि ना.ग. गोरे आणि दुस-या बाजुला श्रि भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, "आफतच आहे. एकिकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग! !!" 

२०) एकदा पु.लं. ना एक कुकरी सेट गिफ्ट म्हणुन मीळाला. तो सेट सुनिता देशपांडे आपल्या भाचीला दाखवत होत्या. सुनिताबाईंचा 'सर्व काही जपुन ठेवण्याचा " स्वभाव माहीत असल्यामुळे भाची सुनिताबाईंना म्हणाली,"अगं, एवढा सुदंर सेट फुटु नये या भितीने तु तो कधी वापरणारच नाहीस का?" त्यावर पु.लं. पटकन म्हणाले "हो तर !! सुनीता मला कधी ओमलेट सुद्धा करुन देत नाही ... अंडी फुटतील म्हणुन !!!" 

२१) पु.लं. चा वाढदिवस होता, एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला. पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले. हे बघुन व्यापारी म्हणाला "काय राव, काय झाले येवढे"? पु.लं. म्हणाले, "बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही" घरात हशा पिकला होता ! 

२२) एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला, 
तो त्याचां चाहता होता. तो म्हणाला की माझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक ञानेश्वर आणी दुसरे तुम्ही. माझ्या खोलीत मी ञानेश्वरा च्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय. तर पु.लं. म्हणाले "अहो असं काही करु नका नहीतर लोक विचारतील, ञानेश्वरानी ज्याच्या कडुन वेद म्हणुन घेतले तो रेडा हाच का म्हणुन?" 

२३) पुलं एकदा चितळ्यांच्या दुकानात गेले, मिठाई खरेदी केली आणि खोक्यात बांधून द्यायला सांगीतले. दुकानातील व्यक्ती म्हणाली "खोक्याचा चार्ज पडेल". त्यावर पुलं म्हणाले (म्हणे), "अरे वा, म्हणजे मिठाई फुकट?" 

२४) एकदा पु.ल. एक खेड्यात उतरले होते. तिकडच्या शाळेच्या प्रिन्सिपलनी त्यांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार केला. पुलंनी दिलेल्या खुर्चीवर बसतच त्या खुर्चीचा हात मोडला. सगळी पोरं खो खो हसायला लागली. ओशाळलेले प्रिन्सिपल पुलना म्हणाले, "माफ करा पण हजारवेळा सांगूनही इकडच्या सुतारांकडून नीट कामच होत नाही." पुल मिश्किलीत म्हणाले, "अहो करवत (!) नसेल" 

२५) डो. श्रीरंग आडारकर यांचे चिंरजीव अशोक यांना त्याच्या विवाहनिमित्त पु.लनी पाठविलेले पत्र. "आजचा दिवस तुझ्या कोमल आयुष्याचा महत्त्वाचा.सुमारे चौतीस वर्षापूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्त्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता." 

२६) स्वत:च्या खास विनोदी पध्द्तीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात," मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या आहे" 

२७) आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित सवयीमुळे पु.ल. एकदा आपल्या पत्नीला-सुनीताईंना -म्हणाले," या घरात मी तेवढा देशपांडे आहे.तू ’उपदेश-पांडे’ आहेस." 

२८) भारती मंगेशकर ह्या दामु अण्णा मालवणकर ह्या प्रसीध्द्य विनोदी कलाकाराची कन्या.त्या दिसायला अतिशय सुरेख होत्या आणी दामू अण्णा तसे दिसायला खास नव्हते!त्यामुळे पु.लं. नी जेव्हा तीला पाहिले तेव्हा म्हणाले " हि मुलगी बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!" 

२९) पु.लं.च्या एका सभेला अत्रे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, पु.ल. थोर साहित्यीक आहेत, त्यांनी खुप साहित्य नीर्मीती केली आहे. नंतर त्यांच्या कडें बघत ते पुढे म्हणाले सहाजिक आहे, त्यांच्या नांवात पु आणि ल दोन्ही आहे,मग निर्मीतिस काय कमी? 

३०) पुलं एका समारंभाला जाण्यासाठी तयार होत असताना म्हणाले," मी कुठल्याही समारंभाला 'बो'लावल्याशिवाय जात नाही. 

३१) एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते म्हणाले," आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते!" 

३२) पुण्यात भानुविलास नावाचे चित्रपटगृह होते. तर सुरुवातीला त्याला पत्र्याचे छप्पर होते. आणि त्याच्या छतातून उन्हाचे कवडसे पडत असत. एकदा पु.ल.(?) तिथे गेले होते आणि ते कवडसे पाहून म्हणाले "अगदी बरोबर नाव ठेवले आहे, भानुविलास!" 

३३) 'वाऱ्यावरची वरात'चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या दिवशी बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगेत उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले... 'प्रयोग संपेपर्यंत थांब!' लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले, 'उद्या याची 'वरात' निघणार आहे, पण तो आजच 'वाऱ्यावर' स्वार होऊन आला आहे'...आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

३४) पुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये पु.ल. विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख म्हणून कार्यरत होते. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळे निर्माते एकत्र बसत असे. त्यांत पु.ल., कविवर्य बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी असायची. त्यावेळचा एक प्रसंग.. महात्मा गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम ठरवण्यासाठी केंद्र्संचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या. कुणी काही कुणी काही कार्यक्रम सुचवले पु.ल. म्हणाले "गांधाजींना मौन प्रिय होते. तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू नये." यावर संचालकांसह सर्व जण खळखळून हसले. 

३५) एकदा एक 'कदम' नावाचे गृहस्थ पु लं कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले.....पु लं नि आशीर्वाद दिला ....... 
'कदम कदम बढाये जा' 

३६) सुनीताबाईंसह वसंतराव देशपांडे आणि पुलंचा गाडीतून प्रवास सुरू असताना जेव्हा समोर एक मोठा गवा आक्रमक भूमिकेत येतो आणि वसंतराव सुनीताबाईंना इंग्रजीत काही तरी सूचना करतात, हे ऐकून "पुलं' म्हणतात, "त्या गव्याला इंग्रजी समजत नाही म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलतात।' 

३७) एका सगींत संमेलनाच्या भाषणात पु.ल. नी एक किस्सा सांगितला होता. 'एकदा एका शेताच्या बांधावरुन जात असताना एक शेतकरी शेतात काहीतरी काम करताना दिसला. आम्हा लेखकांना कुठे गप्पा केल्याशीवाय राहवत नाही. त्या स्वभावानुसार मी त्या शेतकराला विचारलं "काय हो शेतकरी बुवा, या झाडाला कोणते खत घातले तर त्याला चांगले टॉमेटो येतील?" त्यावर तो शेतकरी चटकन म्हणाला "या झाडाला माझ्या हाडांचे खत जरी घातलेत तरी त्याला टॉमेटो कधीच येणार नाहीत कारण ते झाड वांग्याचे आहे।" 

३८) काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं.  गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ' पुलं ' गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले, 'आजकाल मला आपला गणपतीबाप्पा ' गणपतीपप्पा ' झाल्यासारखा वाटत 

३९) आणीबाणी नंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले, ' मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ' संजय उवाच ' असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला !' पुलंनी जनता पक्षाच्या प्रचारसभेतून भाषण सुरू करताच ' त्यांना आत कंठ फुटला आहे ' असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते. त्याचा समाचार घेताना पु.ल. म्हणाले, ' गळा यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही, आणि आता म्हणतात, कंठ फुटला. ते असो, पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही ! 

४०) एक गाजलेल्या संगीत नाटकात एक सुप्रसिद्ध गायक नट कित्येक वर्षं श्रीकृष्णाची भूमिका करत होता. खरं तर, उतारवयामुळं ती भूमिका त्याला शोभत नव्हती, तरीही त्याचं आपलं श्रीकृष्णाची भूमिका करणं सुरूच होतं. प्रश्न होता, त्याला हे सांगायचं कुणी ? एका रात्री त्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगापूर्वीची नेहमीची गडबड सुरू होती. तो नट पीतांबर नेसून, रत्नजडित अलंकार लेवून आणि डोक्यावर मुकूट चढवून, श्रीकृष्णाच्या संपूर्ण पेहरावात हातावरचा शेला आणि सुटलेलं पोट सावरत रंगपटात उभा होता. तेवढ्यात पु.लं. आपल्या काही मित्रांबरोबर रंगपटांत आले. क्षणभर त्या सजलेल्या श्रीकृष्णाकडे पाहतच राहिले. कदाचित त्या नटाचं त्याच्या तारुण्यातील देखणं रुप त्यांच्या डोळ्यासमोर क्षणभर तरळलं असावं. पु.लं.च्या मित्रांना त्यांचं हे त्याला न ओळखण्यासारखं पाहणं थोडं नवलाईचं वाटलं. न राहवून त्यांनी विचारलं, ' हे काय, भाई, ह्यांना ओळखलं नाही का ? अहो, हे आपले... ' पुलं त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, ' अरे व्वा ! ओळखलं नाही, कसं म्हणता ? ह्यांना पाहूनच तर आज देवाला ' अवतार ' ध्यान का म्हणतात, ते समजल. 

४१) एकदा पुल कुटुंब आणि वसंतराव कुठल्याशा अभयारण्यात गेले होते बहुधा राधानगरी. तिथे त्यांच्या कारसमोर एक महाकाय आणि मस्तवाल रानरेडा आला आणि त्यांच्याकडे खुनशीपणे बघू लागला. तेव्हा वसंतराव म्हणाले भाई, आय थिकं ही इस गोइंग टु चार्ज. पुल त्यांना म्हणाले, रेड्याला कळू नये म्हणून इंग्लिशमधे बोलतोयस वाटतं? हे ऐकल्यावर त्या भीतीदायक प्रसंगातही जोरदार हशा पिकला.

४२) एकदा पुलं पुण्यातील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई आणायला गेले. त्या मिठाईवाल्यानं कागदात बांधून ती मिठाई दिली. कागदातल्या मिठाईकडे पाहत पुलंनी ' बॉक्स मिळेल का ?' म्हणून विचारलं. ' हो पण त्या बॉक्सला पैसे पडतील. ' दुकानदारानं टिपिकल पुणेरी पद्धतीनं उत्तर दिलं. ' अरे वा ! म्हणजे मिठाई फुकट , वाटतं ? लगेच पुलं उद्गारले. 

४३) गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ' मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. ' 

४४) हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ' त्यात काय ? ' सफरचंद ' म्हणावं.'मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ' एअर होस्टेसला आपण ' हवाई सुंदरी ' म्हणतो, तर नर्सला ' दवाई सुंदरी ' का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ' वाढपी ' म्हणतो, तर वैमानिकाला ' उडपी ' का म्हणू नये ?' त्याच सुरात पुलं खूप दारू पिणा-याला ' पिताश्री ' किंवा ' राष्ट्रपिता ' म्हणतात 

४५) अरुण आठल्ये आणि पुलं एकदा चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी म्हणून गेले. चायनीज फूडचं वैशिष्ट्य सांगताना पुलं म्हणाले, " चायनीज फूड स्टार्टस वुईथ चिलीज अॅण्ड एण्डस वुईथ लिचीज.  चायनीज फूड पाहताच त्यांना आजची शिक्षणपद्धती आठवते. जेवण घेताना खूप जेवल्यासारखं वाटतं, पण थोड्याच वेळात भूक लागते, हे लक्षात घेऊन पुलं म्हणतात, ' आपल्या शिक्षणासारखं हे चिनी जेवण घेताना खूप घेतल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात पोट रिकामंच राहतं. ' चिनी स्वीट कॉर्न सूप फार प्रसिद्ध आहे. या जेवणात मका फार वापराला जातो. त्यावर पुलंचं भाष्य : ' चिनी भोजनाला सर्वात्मका म्हणायला हवं !' 

४६) पुलंच्या ' सुंदर मी होणार ' या नाटकावर आधारित असलेला ' आज और कल ' हा हिंदी चित्रपट यशस्वी झाला नाही. त्याबद्दल बोलताना पुल म्हणाले, ' हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणं दोनच दिवस चालला. ' आज और कल !' 

४७) १९६५ साली पु.लं. नांदेडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ती बातमी ऐकल्यावर अत्यानंदाच्या भरात श्री. श्रीराम मांडे यांनी ' पुलायन ' ही दिर्घ कविता एकटाकी लिहून काढली. त्यात त्यांनी ' पुलंकित ' शब्द प्रथम वापरला आणि नंतर तो खूपच लोकप्रिय झाला. 

४८) ' माझे खाद्यजीवन ' या लेखात चिवड्यासंबंधी लिहिताना पुलं म्हणतात , '' चिवडा सोलापूरपेक्षा कोल्हापूरचा ! छत्रे यांचा ! महाराष्ट्रावर या तीन छत्र्यांचे अनंत उपकार आहेत . एक चिवडेवाले , दुसरे सर्कसवाले आणि तिसरे केरूनाना गणिती ! उपकार उतरत्या श्रेणीने घ्यावे ! कारण चिवडेवाल्या छत्र्यांनी कोल्हापूरच्या ' रम ' ला जी झणझणीत साथ दिली , ती असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या अस्मानात पोहोचवून आली ....'' हे वाचल्यानंतर कोल्हापुरी संगीत चिवड्याचे आद्य निर्माते छत्रे गहिवरून गेले . त्यांनी आपले वार्धक्य विसरुन स्वतःच्या हातांनी पुलंसाठी चिवडा केला . पंधरा - सोळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे . त्यांनी पुलंना सांगितले , कित्येक वर्षांनंतर मी स्वतः खास चिवडा बनवतो आहे . तो स्विकारा.त्यांनी त्यापूर्वी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या चिवड्याचा डबा पाठवला होता . कुणाला ? लोकमान्य टिळकांना ! लोकमान्य विलायतेला निघाले होते तेव्हा ! 

४९) "हॅलो , शांताबाई ना ? मॉस्कोहून गोर्बाचेव्ह तुमच्याशी बोलू इच्छितायत . तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ... '' 
"' काय भाई , तुम्ही नाव कधी बदललंत ? अं ?'' फोनवरील व्यक्तीचा सुपरिचित आवाज बरोबर ओळखून , हसू आवरत शांताबाई पु . लं . ना दाद द्यायच्या ... बारा ऑक्टोबर हा ज्येष्ठ कवयित्री शान्ता ज . शेळके यांचा आणि आठ नोव्हेंबर हा मराठी माणसांचे लाडके व्यक्तिमत्त्व पु . ल . देशपांडे यांचा वाढदिवस . उभा महाराष्ट्र दरवर्षी ते आपलेपणाने साजरे करीत ; तर साहित्य क्षेत्रातील ही दोन मोठी माणसं एकमेकांच्या अशा ' खोड्या काढीत ' साजरा करीत . पण पु . लं . आणि सुनीताबाईंच्या विवाहाचा ' बारा जून ' हा ( भाईंचा स्मृतिदिनही हाच ) खास दिवस शांताबाईंनी आवर्जून सुनीताबाईंना भेटण्याचा दिवस असायचा . 

50) एकदा पु ल शाळेत असताना त्यांना कोणीतरी म्हणाले, 
" ए देशपांडे तुमचे पूर्वज शेण वीकायचे ना ? " त्यावर पु ल लगेच म्हणाले, "हो ना तुमच्या पूर्वजांना शेण खायला लागायचा ना म्हणून विकायचो आम्ही.!"

जिन स्मरण

• णमोकार मन्त्र  https://youtu.be/fUntR5T4bJQ?feature=shared • भक्तामर स्तोत्रम् https://youtu.be/UPF4YwJKFIQ?si=9tlAC0T3fTx7H7uy • गणधर वलय...