Sunday, May 17, 2020

देवा!तुझा खेळ संपव आता* 🙏

🙏 *देवा!तुझा खेळ संपव आता* 🙏

*खेळ सारे खेळून झाले..*
*जुने फोटो बघून झाले*
*जुने दिवसही जगून झाले*
*सक्तीच्या सुट्ट्या नको बाप्पा*
*देवा, तूझा खेळ संपव आता..*

*कंटाळा आला* 
*भितीयुक्त स्वच्छतेचा*
*सॅनिटायझर अन् मास्कचा*
*घरात कोंडून बसण्याचा*
*खोटंखोटं हसण्याचा*
*संकटाला घे आवरता*
*देवा, तूझा खेळ संपव आता..*

*नव्या पिढीच्या स्वप्नांसाठी*
*मांडलेल्या अर्ध्या डावांसाठी*
*हातांवरच्या पोटासाठी*
*देवा, तूझा खेळ संपव आता..*

*जगाचा धीर खचण्याआधी*
*सहनशक्ती संपण्याआधी*
*तुझ्यावर प्रश्न उठण्याआधी*
*देवा, तूझा खेळ संपव आता..*

*नाही म्हणणार मी,वेळच नाही*
*कुटूंब,नात्यांना न्याय देईल पूरता*
*निसर्ग,सृष्टी चे करेल मी रक्षण*
*या कोड्याच उत्तर सांग ना आता*
*देवा, तूझा खेळ संपव आता..*

*दिली तेवढी शिक्षा पूरे* 
*चुका आमच्या कळाल्या बरे*
*मन, विचारही शुद्ध ठेवेल रे*
*हाताला स्वच्छ करता करता*
*वचन आम्ही देतो तुजला*
*देवा, तूझा खेळ संपव आता..*🙏🏻🙏🏻🙏🏻😔

No comments:

Post a Comment

जिन स्मरण

• णमोकार मन्त्र  https://youtu.be/fUntR5T4bJQ?feature=shared • भक्तामर स्तोत्रम् https://youtu.be/UPF4YwJKFIQ?si=9tlAC0T3fTx7H7uy • गणधर वलय...