चेन्नईतील न्यूरोसर्जन. एका हॉस्पिटलचा मालक. शेकडो हजारो लोकांचे जीव वाचवले असतील आतापर्यंत. शेकडो हजारो पेशंट मोफत केले असतील. कोरोना उद्रेकातही रुग्णसेवा चालू. कोविड ने त्यांना गाठलं आणि शेवटी आपोलोच्या ICU मध्ये जीव गेला. खरी परवड त्यानंतरच सुरू झाली.
मृतदेह पुरताना जमावाने नातेवाईकांना पळवून लावलं.
दुसऱ्या स्मशानभूमीमध्ये नेलं असता शंभरेक लोकांचा जमाव काठ्या आणि दगड घेऊन आला. अंबुलन्स ड्रायव्हरला मारून डोके फोडले. मृतदेह सोडून नातेवाईकांना पळवून लावले. शेवटी आरोग्यमंत्र्यांनी फोन केल्यावर पोलीस आले. मृतदेह पुरला. दुरून दगडगेक चालूच होती.
कोणत्या लोकांसाठी जीव धोक्यात घालायचा डॉक्टरांनी? डॉक्टरांचं मरणं पण सन्माननीय नसेल, दोन मीटर जमीन पण पुरायला देणार नसाल, तर कुठल्या समाजाचं, कुठलं देणं आम्ही लागतो? अभिमान वाटायचा डॉक्टर झालो याचा .... आतापर्यंत. पश्चाताप होतो आहे आता.
उद्या 22 एप्रिल रात्री 9 वाजता सर्व डॉक्टर मेणबत्ती पेटवून मूक आक्रोश करतील.
डॉ नितीन ढेपे
No comments:
Post a Comment