अंबाबाईच का🌸
कोल्हापूरची देवी महालक्ष्मी नसून 'अंबाबाई' आहे.
१) कोल्हापूरची देवीचे नाव हे 'अंबाबाई' आहे. तिचे महालक्ष्मी नाव कधीच नव्हते. भारतामध्ये देवी आदिशक्ती सतीची ५२ शक्तिपीठे आहेत. त्यापैकी साडे ३ शक्तीपीठ महाराष्ट्रात आहेत. तुळजापुरची भवानी माता, माहुरगडाची रेणुका माता, कोल्हापूर ची अंबाबाई, आणि अर्धे शक्तीपीठ वणीची सप्तशृंगी. जर कोल्हापूरची अंबाबाई शक्तीपीठ म्हटलं तर ती कधीच विष्णू पत्नी होणार नाही. कारण सतीची कलेची ५२ तुकडे ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी ५२ शक्तीपीठ तयार झाले. अंबाबाई ही शिवपत्नी आहे.
२) अंबाबाई च्या देवळात अंबाबाई च्या गाभाऱ्यावर पहिल्या मजल्यावर शिवमंदिर आहे. तिने शिवाची मातृका पिंड धारण केली आहे. अंबाबाई च्या मूर्तीचा अभ्यास केल्यास तिने कोणत्याही प्रकारे विष्णू चिन्ह परिधान केलं नाही आहे. उलट अंबाबाई मूर्ती जवळ वाहन सिंह आहे. सगळी शिवचिन्ह आहेत.
३) आता मुद्दा तिरुपती- अंबाबाई ह्या गैरसमज बद्दल.
काही वर्षपूर्वी काही तिरुपती भक्त आई अंबाबाई च्या ट्रस्ट च्या अधिकार कक्षेत आल्यामुळे त्यांनी ह्या चुकीच्या प्रथा पाडण्यास सुरवात केली.
आपण डोळसपणे पाहिल्यास असे लक्षात येईल की तिरुपती देवस्थान कडून शालू भेट देण्याची प्रथा सुरू केली. ही मागील २० वर्षातच चालू आहे (या अगोदर अशी कोणतीही प्रथा नव्हती), हे कमी की काय,
तिरुपती देवस्थान सारखे लाडू चा प्रसाद देण्याची सुरवात केली, ( या आधी लाह्या आणि बत्तासे चा प्रसाद मिळत असे).
अंबाबाई नाव बदलून महालक्ष्मी नाव पुढे केलं गेलं (२००० सालाच्या अगोदर एकही सरकारी कागदपत्रात महालक्ष्मी म्हणून कुठेही उल्लेख नाही. अगदी इंग्रजांच्या काळातली सुद्धा कागद पत्रात 'अंबाबाई' च उल्लेख आहे.
४) सर्वात महत्वाचे कोणत्याही दानव, राक्षस अधर्मी वृत्ती यांचा संहार माता पार्वती करते कारण ती आदिमाया जगदंबा आहे. तिने शस्त्र धारण केले आहेत. अंबाबाई ने या कारणास्तव कोल्हासुरचा वध केला आहे. लक्ष्मी माता ही संहारक नाही. ती धन पूरक देवता आहे. ती कोणाचा वध करत नाही.
५) शेवटचा मुद्दा श्रीविष्णू (तिरुपती) यांची पत्नी लक्ष्मी (पद्मावती) यांचे मंदिर तिरुपती पासून ५ किलोमीटर वर च आहे.
सारांश-
काही लोक आपल्या हट्टापायी माता पार्वतीच्या शक्तीपीठ ला उगाच विष्णुपत्नीचे रूप देत आहेत
No comments:
Post a Comment