Saturday, November 4, 2023

पार्टी नकोय मित्रा तुझी

 पार्टी नकोय मित्रा तुझी 

येवून फक्त भेटत जा,

काय चाललंय मनात तुझ्या 

भेटून फक्त बोलत जा, 

🙏🙏

मोकळं सोड स्वतःला जरा 

कधीतरी मोकळं होत जा, 

हलकं वाटेल तुझंच तुला 

मन रिकामं करत जा, 

🙏🙏

जुन्या आठवणी गप्पागोष्टी 

आमच्यात सुद्धा रमत जा, 

आलेच कधी वाईट विचार 

बिनधास्त फोन करत जा, 

🙏🙏

काय आहे आयुष्य अजून 

निदान मनातले वाटत जा, 

पहा किती फरक पडतो 

आनंद तेव्हढा लुटत जा, 

🙏🙏

पन्नाशीला आलोय आपण 

संपर्कात तेव्हडं रहात जा, 

काय हवं काय नको तुला 

कुणाला तरी सांगत जा, 

🙏🙏

मित्र असतात कशासाठी 

मैत्री तेव्हढीच जपत जा, 

आम्ही फक्त मस्त जगतो 

तसाच मस्त जगत जा, 

🙏🙏

पैसा नाही लागत त्याला 

मनातले मात्र सांगत जा, 

पार्टी नकोय मित्रा तुझी 

येवून फक्त भेटत जा,

No comments:

Post a Comment

जिन स्मरण

• णमोकार मन्त्र  https://youtu.be/fUntR5T4bJQ?feature=shared • भक्तामर स्तोत्रम् https://youtu.be/UPF4YwJKFIQ?si=9tlAC0T3fTx7H7uy • गणधर वलय...