Saturday, November 4, 2023

वकिलांची बुद्धीमत्ता किती थोर असते ह्याच ऊदाहरण.....🙏🙏🙏

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एका गटाने वकिलाला विचारले, सर, 'वकिली' म्हणजे काय...?"

वकील म्हणाले, "यासाठी मी एक उदाहरण देतो.🤔🤔🤪🤪🤪


समजा दोन लोक माझ्याकडे आले. एक अतिशय स्वच्छ आणि दुसरा अतिशय घाणेरडा. मी दोघांना आंघोळ करून स्वच्छ होण्याचा सल्ला देतो.


आता तुम्हीच सांगा, त्यांच्यापैकी कोण आंघोळ करेल?"🤔🤔🤔🤪🤪


एक विद्यार्थी म्हणाला, “जो घाणेरडा आहे तो आंघोळ करेल🤪🤪🤪😀🤔🤔."

वकील म्हणाले, "नाही, फक्त स्वच्छ माणूसच हे करेल. कारण, त्याला आंघोळ करायची सवय आहे तर घाणेरड्या माणसाला स्वच्छतेचे महत्त्व कळत नाही."


वकील : "आता सांगा कोण आंघोळ करेल?"🤪🤪🤔🤔🤔

दुसरा विद्यार्थी म्हणाला, “स्वच्छ व्यक्ती.”😀😀😀🤔🤪🤪🤪🤔🤔


वकील म्हणाले, “नाही, घाणेरडा माणूस आंघोळ करेल कारण त्याला स्वच्छतेची गरज आहे.😀😀😀🤪


आता सांग, कोण आंघोळ करेल...?"

दोन विद्यार्थी म्हणाले, “जो घाणेरडा आहे तो आंघोळ करेल."😀😀🤪


वकील म्हणाले, “नाही, दोघेही आंघोळ करतील… कारण स्वच्छ माणसाला आंघोळ करायची सवय असते आणि गलिच्छ माणसाला आंघोळ करावी लागते.😀😀


आता सांगा आंघोळ कोण करणार?"😀😀🤔🤔


आता तीन विद्यार्थी एकत्र म्हणाले, “हो, दोघेही आंघोळ करतील."🤔🤔🤔😀😀😀

वकिलाने सांगितले, “चुक, कोणीही आंघोळ करणार नाही, कारण घाणेरड्याला आंघोळ करण्याची सवय नसते तर स्वच्छ माणसाला आंघोळ करण्याची गरज नसते.😀😀😀


आता सांगा आंघोळ कोण करणार?"

एक विद्यार्थी नम्रपणे म्हणाला, "सर, तुम्ही प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे देता आणि प्रत्येक उत्तर बरोबर असल्याचे दिसते. आम्हाला योग्य उत्तर कसे कळणार?"

🤔🤔🤔


वकिलाने सांगितले, "वकिली म्हणजे हेच आहे... वास्तव काय आहे हे महत्त्वाचे नाही... पण तुमचा मुद्दा बरोबर सिद्ध करण्यासाठी तुम्ही कसा आणि किती युक्तिवाद मांडू शकता हे महत्त्वाचे आहे."🤪🤪😀

No comments:

Post a Comment

जिन स्मरण

• णमोकार मन्त्र  https://youtu.be/fUntR5T4bJQ?feature=shared • भक्तामर स्तोत्रम् https://youtu.be/UPF4YwJKFIQ?si=9tlAC0T3fTx7H7uy • गणधर वलय...