Saturday, November 4, 2023

त्या रावणाला दहा तोंडे होती. आजच्या रावणांना दहा पोट आहेत. हपापाचा माल कितीही गपापा केला तरी त्यांची क्षुधा शमत नाही. तो रावण दशग्रंथी ब्राह्मण होता, आजचे रावण तर अक्षरशून्य आहेत, अक्कलेच्या जागी डोक्यात कांदे बटाटे भरले आहेत! 


एक रावण होता तर भगवंताला अवतीर्ण व्हावं लागलं होतं. आज रावणांची मोजदाद करणं कठीण आहे एवढी त्यांची संख्या वाढली आहे. 


नुसतं " मन से रावण जो मिटाएं राम उसके मन में हैं” म्हणत रावणाचा विनाश होत नाही. कृती करावीच लागते. जे त्या भगवंताच्या अवताराला चुकले नाही ते कर्म आपल्यासारख्या पामरांना कसे चुकेल? 


तस्मात् केवळ रामनाम जपत राहणे पुरे, त्यांच्यासारखी कृती करणे क्रमप्राप्त आहे. 


प्रकाण्डकाण्डकाण्डकर्मदेहछिद्रकारणम्

कुकूटकूटकूटकौणपात्मजाभिमर्दनम्।

तथागुणंगुणंगुणंगुणंगुणेन दर्शयन्

कृपीटकेशलंघ्यमीशमेकराघवं भजे ॥४॥

जो आपल्या तीक्ष्ण बाणांनी निंदनीय कृत्य करणार्‍या राक्षसांच्या देहांना छेदतो,जो अधर्माच्या वाढीसाठी भ्रम आणि असत्याचा आश्रय घेणाऱ्या मदमस्त राक्षसांना मारतो,जो आपल्या पराक्रमाने आणि आपल्या धनुष्याच्या आधारे आणि चतुराईने राक्षसांचा पराभव करतो.मी त्या राक्षससंहारक राघवाची पूजा करतो

No comments:

Post a Comment

जिन स्मरण

• णमोकार मन्त्र  https://youtu.be/fUntR5T4bJQ?feature=shared • भक्तामर स्तोत्रम् https://youtu.be/UPF4YwJKFIQ?si=9tlAC0T3fTx7H7uy • गणधर वलय...