Saturday, November 4, 2023

लक्ष्य मोठे ठेवा पण सुरवात छोटी करा.....

एकदा गरुडा चे पिल्लू मुक्त उडायला शिकले होता. उत्साहाच्या भरात ते सगळ्यांना आपल्या कौशल्य दाखवत होतं. एकदा उडता उडता त्याला जमिनीवरून एक डुक्कर जाताना दिसलं. त्या डुकराचं मांस त्याला खाऊ वाटलं तो लगेच त्याच्या आईला म्हणाला, आई हे बघ किती छान डुक्कर आहे ते मी पकडू का खायला किती छान लागेल ना? आई म्हणाली, बेटा तू आता अजून खूप लहान आहे तो आधी उंदराला पकडायला अशी गरुडा चे पिल्लू आज्ञाधारक होतो. त्याच्या आई चं ऐकलं आणि लवकरच तो उंदीर पकडन्याय तरबेज झाला. काही दिवसांनी गरुडा च्या पिल्लाने पुन्हा आई ला विचारलं आई मी आता उंदीर पकडाय ला शिकलोय आता मी डुक्कर पकडू का गरुड आई म्हणाली आता नको तू आधी सश्याला पकडून दाखव पिल्लू म्हणाला ठीक आहे पिल्लाने सराव सुरू केला आणि काही दिवसातच तो ससा पकडाय ला शिकले. काही दिवसांनी पुन्हा त्याने आई ला विचारलं, आई आता मी डुकर पकडू का? आई म्हणाली, तू आता बकरी चं कोकरू पकडून दाखव पिल्लू हा ठीक आहे त्याने पुन्हा सरावा ला सुरुवात केली आणि काही दिवसातच कोकरू पकडून दाखवलं. गरुडा च्या पिल्लात ताकद आली होती ते मोठं झालं होतं त्याच्या पंखां मध्ये आणि चोची मध्ये बळ आलं होतं आणि त्याच्यात आत्मविश्वास ही दिसत होता.

               

एक दिवस गरुड आणि पिल्लू एका टेकडी वर बसलेले होते. एक डुकरा चे पिल्लू जमिनीवरून जात होतं. पिल्ला ने आईकडे बघितलं. गरुडाने त्या पिल्लाला इशारा केला. गरुडाच्या पिल्ला ने आत्मविश्वासाने झेप घेतली आणि एका झडपेत ते डुकराचं पिल्लू उचललं आणि उंच टेकडीवर त्याचा फडशा पाडला. गरुडा च्या पिल्ला ला आपल्या लक्ष्य प्राप्त केल्या चा आनंद वाटत होता. त्याचा उत्साह आणि आत्मविश्वास गगनात मावत नव्हता. मित्रांनो, गरुडा च्या आई ने जर पहिल्यांदाच पिल्ला ला डुक्कर पकडला हो म्हटलं असतं तर तो अपयशी झाला असता त्यामुळे त्याचा आत्मविश्वास ही खचला असता कदाचित तो पुढे शिकार करण्यातच घाबरला असता म्हणून गरुड आई ने त्याच्या आवाक्यात असलेल्या लहान मुला पासून सुरुवात करायला सांगितली आणि मग शेवटी त्याला डुक्कर पकडला सांगितला जातो. सहज यशस्वी झाला मित्रांनो, आपण ही आपलं लक्ष्य मोठे ठेवाय ला हवं पण त्या ची सुरुवात लहानपणापासून केली पाहिजे असं केलं तर आपल्या ला रिस्क कमी राहील आणि आपण आपले ध्येय आपले लक्ष निश्चितच गाठू...

No comments:

Post a Comment

जिन स्मरण

• णमोकार मन्त्र  https://youtu.be/fUntR5T4bJQ?feature=shared • भक्तामर स्तोत्रम् https://youtu.be/UPF4YwJKFIQ?si=9tlAC0T3fTx7H7uy • गणधर वलय...