Saturday, November 4, 2023

॥ नित्य श्री जानेश्वरी ॥

॥ नित्य श्री

 ज्ञानेश्वरी ॥ अध्याय १ | ओवी क्रमांक ११०


हे अप्रतिमल्ल जगीं । पुरता प्रतापु अंगीं । परी सर्व प्राणें मजचि लागी । आरायिले असती ॥११०॥


जगात ज्यांच्या तोडीचा दुसरा योध्दा नाही, ज्यांच्या अंगात पुरेपूर बळ आहे, असे हे सर्व वीर असूनही जीवाभावाने मलाच अनुसरले आहेत. ११०

अध्याय १ | ओवी क्रमांक ७९


जातें कामधेनु माये । तयासी अप्राप्य कांहीं आहे । म्हणौनि मी प्रवतों लाहें । ग्रंथीं इये ॥७९॥


ज्याची आई कामधेनू आहे; त्याला जगात दुर्मिळ असे काय आहे? त्याप्रमाणे श्रीगुरू आणि संत यांचा मला आधार आहे, म्हणून मी या गीता ग्रंथाकडे प्रवृत्त झालो आहे. ७९.

॥ नित्य श्री ज्ञानेश्वरी ॥


• अध्याय १ | ओवी क्रमांक ३३


म्हणौनि हा काव्यांरावो। ग्रंथ गुरुवतीचा ठावो। एथूनि रसां झाला आवो | रसाळपणाचा ॥ ३३॥


म्हणूनच हा महाभारत ग्रंथ, काव्यांचा राजा असून इतर ग्रंथांच्या मोठेपणाला उगम झाला. आहे, आणि शृंगारादि रसांना रसाळपणाचा डौल देखील या महाभारतापासूनच प्राप्त झाला आहे. 22.

No comments:

Post a Comment

जिन स्मरण

• णमोकार मन्त्र  https://youtu.be/fUntR5T4bJQ?feature=shared • भक्तामर स्तोत्रम् https://youtu.be/UPF4YwJKFIQ?si=9tlAC0T3fTx7H7uy • गणधर वलय...